नवीन लेखन...

तांदूळ, तीळ, खसखस ,तुळशीचे बी यावर जलरंगाने रंगविलेले विविध आकारातील श्री गणेश

  जन्म:ताच कोणी अभ्यास किंवा कुठलीही कला शिकून येत नाही. पण सराव, मेहनत, प्रयास, आणि चिकाटीने ती साध्य करता येते.  मला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. माझ्या वडिलांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ मधून चित्रकलेची डीग्री घेतली होती. वडिलांच्या सहवासात राहून मी चित्रकलेचे धडे गिरविले. पण कधी चित्रकलेच्या परीक्षेस बसावे असे वाटले नाही. परंतू चित्रकलेच्या माध्यमाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घेता येईल हे नक्की जाणले.  

जसजसे चित्रकलेची गोडी वाढत गेली तसे कॅनव्हासही बदलत गेले आणि मग तांदूळ, तीळ, खस,तुळशीचेबी अश्या धान्यांवर विविध आकारातील श्री गणेश चीतारण्याची/रंगविण्याची कल्पना मनात रुजायला लागली. आणि मग माध्यमे बदलता बदलता टाइपरायटर, कंपास, विविध नाणी यांच्या साह्याने बरीच चित्र रेखाटली असे म्हणण्याचे मी धारिष्ट्य करणार नाही कारण करता करविता श्री गणेशाने ही सेवा माझ्याकडून करून घेतली असेच म्हणणे अगदी १०८ टक्के उचीत आणि खरे आहे. 

ही कला आपल्या पर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या मराठीसृष्टीने व्यवस्थित पार पाडले. त्याबद्दल मी त्यांच्या ऋणी आहे.

 

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..