नवीन लेखन...

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं “परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात”. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. […]

विरोधाभासात बुडाला विकास!

सरकारी शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांविना ओस पडत आहेत आणि खासगी शिकवणी वर्ग दुथडी भरून वाहताना दिसतात, हा विरोधाभास नाही का?

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या देशाचा विकास इतका का रखडला किंवा आपण अजूनही विकसनशील अवस्थेतच का आहोत, हा प्रश्न खरोखरच रहस्यमय म्हणावा लागेल. या संदर्भात भारताची तुलना नेहमीच चीनसोबत केली जाते आणि ती स्वाभाविकही आहे.
[…]

फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल. […]

लोकशाहीची लक्तरे!

राजकारणी आणि बड्या नोकरशहांमध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात साटेलोटे असतात, ही बाब जगजाहीर असली तरी यावेळी राजकारणी मंडळींनी मलईदार खात्यांसाठी जो जाहीर तमाशा मांडला तो लोकशाहीची उर्वरित लत्त*रे वेशीवर टांगणारा ठरला.त्यामुळे भविष्यात आता परीपूर्ण भ्रष्टाचाराकरीता जनतेने तयार राहावे हेच उत्तम.महागाई एवढ्यातच कमी होणार नाही, हे सांगुन शरद पवारांनी ह्याची पुष्टी केलीच आहे.
[…]

घात सेनेचा झाला की मराठी माणसाचा?

शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..