नवीन लेखन...

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ७

भाग ७ – समारोप 

अठराव्‍या शतकातील चित्र असे आहे की, अनेक बादशहा आले-गेले, अनेक वझीरही आले-गेले ( स्‍वतः निजाम-उल्‍मुल्‍कही दिल्‍लीचा काही काळ वझीर होता ) नादिरशहा व अब्‍दालीने दिल्‍ली लुअली, पण मुघलांची पातशाही नेस्‍तनाबूद करून स्‍वतः दिल्‍लीपती होणे कोणालाच आवश्‍यक वाटले नाही. त्‍या काळातील सर्वच हिंदू, मुस्लिम सत्ताधार्‍यांनी व राजकारण्‍यांनी हेच धोरण स्‍वीकारलेले होते, ही गोष्‍ट ध्‍यानात घेणे आवश्‍यक आहे. इंग्रजांनी सुद्धा शक्‍यतो स्‍थानिक राजांना व संस्‍थानिकांना नावापुरते त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या गादीवर तसेच राहू दिले व आपल्‍या हातात सत्ता घेतली. त्‍यांनाही १८५७ पर्यंत ( म्‍हणजे स्‍वतःचे भारतातील अस्तित्‍वच धोक्‍यात येईतो ) मुघल बादशलाला पदच्‍युत करण्‍याची आवश्‍यकता वाटली नाही. १७व्‍या शतकातही शहाजीने लहानग्या निजामशहाला मांडीवर घेऊन, स्‍वतः वझीर बनून राज्‍यकारभार चालवण्‍याचा असाच प्रयोग केला होता. राजकारणात अशीच व्‍यवहाराशी सांगड घालून आपले ईप्सित साध्‍य करावे लागते.

सैनिकी व राजकारणी दृष्‍टीने सत्ता काबीज करण्‍यापेक्षाही महत्त्वाची गोष्‍ट आहे सत्ता टिकवणे. हेमूनेही सत्ता काबीज केलीच होती, पण किती काळ त्‍याची सत्ता टिकली ? शहाजीचा निजामशाहीतील प्रयोग अयशस्‍वी झाला कारण त्‍याची सैनिकी शक्‍ती अपुरी पडली. पानपताच्‍या आधी दिल्‍लीश्वर म्‍हणून मराठ्यांची सत्ता टिकू शकेल अशी परिस्थिती येण्‍याची संधीच राहिली नाही ! हे इतिहासातील सत्‍य आपण समजून घेतले पाहिजे.

मराठ्यांचे दोष अथवा चुका कबूल करायलाच हव्‍या. मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. इतिहासाचा योग्‍य तो अन्‍वयार्थ लावल्‍यावर हाच निष्‍कर्ष निघतो.

‘मराठी’ संस्‍कृती व ‘मराठी’ मनोवृत्ती यांच्‍याबद्दल मराठी माणसाची दिशाभूल होऊ नये, मराठीपणाचा अभिमान बाळगणे म्‍हणजे अल्पसंतुष्‍टपणा नव्‍हे हे त्‍याला पटावे, म्‍हणून हा सारा प्रपंच.

– – –
(समाप्त)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 283 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..