नवीन लेखन...

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ७

समारोप – मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ६

१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ५

ऑगस्‍ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्‍लीपती बनण्‍यासाठी अनुकूल नव्‍हती. स्‍वारीस निघाल्‍यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्‍वारीत मराठ्यांना येऊन मिळण्‍याविषयी पत्रे पाठवली होती. अब्‍दालीशी लढायला आल्‍यावर आणि त्‍यासाठी हिंदुस्‍थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्‍यावर आणि स्‍वतः अब्‍दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्‍यावर, मराठ्यांना त्‍यावेळी दिल्‍लीपती कसे होता आले असते ? […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ४

मराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ३

१७१९ मध्‍ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्‍तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्‍यानात घेऊनच. शाहूला स्‍वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्‍यातील हिस्‍सा त्‍याला दिला की तो खुष होता. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग २

मराठी सत्ता भारतव्‍यापी झाली ती १८व्‍या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्‍लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्‍या दिल्‍लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्‍यापूर्वी आपण १८व्‍या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग १

अठराव्‍या शतकात मराठी सत्तेने प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या भारताचा बराच भूभाग आपल्‍या अधिपत्‍याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्‍येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्‍लीला धडक दिली वा दिल्‍ली काबीजही केली पण ते दिल्‍लीपती झाले नाहीत. याचे कारण म्‍हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्‍याचा मराठी भाषा, संस्‍कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्‍या स्‍वाभिमानामुळे आणि आपल्‍या आत्‍मसंतुष्‍ट किंवा अल्‍पसंतुष्‍ट वृत्तीमुळेच मराठे दिल्‍लीच्‍या उंबरठ्यावरच राहिले, दिल्‍लीपती झाले नाहीत. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..