नवीन लेखन...

हृदयविकाराचा त्रास जडलेल्या लोकांनी काय खावं ?

हृदय स्नायूंचं बनलेलं आहे. त्या स्नायूंचं वैद्यकीय नाव आहे ‘मायोकारबीयम’. हे स्नायू सतत आकुंचन पावत असतात. ‘कॉरोनरी आर्टरीज’ नावाच्या दोन शुद्ध रक्तवाहिन्या आणि त्यांच्या असंख्य शाखा तसंच उपशाखा यांच्यामधून हृदयाच्या स्नायूंना भरपूर रक्तपुरवठा सतत होत असतो. हृदयाला चांगला रक्तपुरवठा होण्यासाठी पौष्टिक पण संतुलित आहार रोजच्या खाण्यात आला पाहिजे.

कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल मेणासारखा मऊ पण रक्तात न मिसळणारा पदार्थ असतो. ७० टक्के कोलेस्टेरॉलची निर्मिती यकृतात होते. तर २५ ते ३० टक्के कोलेस्टेरॉल आहारातून मिळतं. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारच असतं.

एचडीएल : हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. या कोलेस्टेरॉलचा दर्जा शरीरासाठी चांगला असतो.

एलडीएल : लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. वाईट प्रकारचं कोलेस्टेरॉल म्हणून ‘एलडीएल’ओळखलं जातं. यामुळे धमनी काठिण्य नावाचा हृदयरोग जडतो. आहारात फायबरचं प्रमाण (तंतुमय भाज्या, फळं तसंच नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्यं) जास्त असल्यास एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि एलडीएल या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण आपसूकच घटतं.

तेल आहारात वापरात असलेलं तेल हे दोन प्रकारचं असतं. सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅटच्या अतिसेवनाने (लोणी, डालडा, साय इ.) रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. हे प्रमाण हृदयविकाराला आमंत्रण देतं.

अनसॅच्युरेटेड पुन्हा अनसॅच्युरेटेड तेलात दोन प्रकार असतात. *पीयूएफए *पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅेसिड. म्हणजे पुफ्फा. *एमयूएफए * मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅमसिड. अर्थात मुफ्फा.

पुफ्फा हे रक्तातील चांगल्या आणि वाईट या दोन्ही कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. ‘पुफ्फा’ असलेल्या ओमगा ३ आणि ओमेगा ६ या फॅटी अॅयसिडच्या सेवनाने हृदयाभिसरण उत्तम होतं. पण शरीरात त्याची निर्मिती होत नसल्यामुळे आहाराद्वारे ते घेणं उत्तम. उदा. भोपळयाच्या बिया, अळशी, मका, सनफ्लॉवर तेल, करडई तेल.

पीयूएफए या प्रकारातील ते जास्त तापलं तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. नवीन संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, फक्त आणि बराच काळ पुफ्फा असलेलं तेल वापरल्यास वाईट कोलेस्टेरॉलसोबत चांगलं कोलेस्टेरॉलही कमी होतं. म्हणून आहारात फक्त पुफ्फा तेल न वापरता त्यात मुफ्फा असलेलं तेल मिक्स करून वापरावं. मुफ्फा या प्रकारचं तेल हे रक्तातील वाईट आणि हानिकारक असं एलडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. इतकंच नव्हे तर ते रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं.

उदा. बदाम-आक्रोड, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह तेल, मोहरीचं तेल, राईसब्रॅन तेल, कनोला तेल (मक्याचं तेल)
ऑलिव्ह ऑईल हे चांगलं असलं तरी त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो. म्हणजे ते जास्त तापलं तर त्यातील पोषण मूल्य कमी होतातं. त्यामुळे या तेलाचा वापर आहारात कच्चाच करावा. म्हणजे पदार्थ तयार झाल्यावर वरून दोन ते तीन थेंब ऑलिव्ह ऑईल वापल्यास हरकत नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/ प्रहार

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..