नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १०१ ते ११०

जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची |
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101||

अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे |
देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102||

हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी |
परदव्य आणीक कांता परावी | यदर्थी मना सांडि जीवी करावी ||103||

क्रियेवीण नानापरी बोलिजेते | परी चित दुश्र्चित ते लाजवीते |
मना कल्पना धीट सैराट धांवे | तया मानवा देव कैसेनि पावे ||104||

विवेके क्रिया आपुली पालटावी | अती आदरे शुध्द क्रिया धरावी |
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा | मना कल्पना सोडि संसारतापा ||105||

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा | विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा |
दया सर्व भूती जया मानवाला | सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ||106||

मना कोप आरोपणा ते नसावी | मना बुध्दि हे साधुसंगी वसावी |
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी | मना होइ रे मोक्षभागी विभागी ||107||

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे | क्रिया पालटे भक्तीभावर्थ लागे |
क्रियेवीण वाचाळता ते निवारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||108||

जनी वादवेवाद सोडूनि द्यावा | जनी सूखसंवाद सूखे करावा |
जगी तोचि तो शोकसंतापहारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||109||

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे | विवेके अहंभाव याते जिणावे |
अहंतागुणे वाद नानाविकारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||110||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..