नवीन लेखन...

भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय सर्वकाही अशक्य

  आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे प्रचारक महान कृष्णभक्त श्रीकृष्णानंद प्रभू यांचे प्रचवन ऐकायला मिळाले. अहमदनगरमधील कृष्णभक्त ऋषभदेव प्रभू यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजिठत करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, की अध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरुंच्या चरणी सादर प्रणाम करायला हवा. भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय गवताचे पातेही हलत नाही. सूर्य आणि चंद्र प्रकाश, जलरस, बुद्धी, बल, सौंदर्य आदी प्रत्येकांत भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवंतांच्या कृपेपूर्वी त्यांच्या प्रामाणिक भक्तांची कृपा आवश्यक आहे. गृहस्थाश्रमातील व्यक्तींनी भक्तींमध्ये प्रगती करण्यासाठी वारंवार साधुसंग करणे आावश्यक आहे. अहमदनगरमधील कृष्णभक्त राघवेंद्र प्रभू आणि इतर कृष्णभक्तांनी अथक परिश्रम घेत श्रीचैतन्य भागवत या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. या मराठी ग्रंथाचे प्रकाशनही श्रीकृष्णानंद प्रभुंच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या अनुषंगाने कृष्णानंद प्रभू यांनी या प्रवचनोदरम्यान भगवान श्रीचैतन्य महाप्रभुं विषयी अभ्यासपूर्ण भाष्य केेले. यावेळी ते म्हणाले, की एका वैष्णवाच्या केवळ दर्शनाने सर्व पतित जीवांचा उद्धार होतो. वैष्णवांची महिमा गंगोत्रीपेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. आपल्या सद्‌गुरुकडे शुद्ध कृष्णभक्ताने भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आश्रय प्राप्त होण्याविषयी विनम्र प्रार्थना केेली पाहिजे. विविध छोट्या छोट्या कथांद्वारे श्रीकृष्णानंद प्रभूंनी उपस्थित कृष्णभक्तांना श्रीचैतन्य भागवत आणि भगवान श्रीकृष्णांविषयी सविस्तर ज्ञान प्रदान केले. कन्याकुमारी या भारताच्या शेवटच्या टोकाविषयी त्यांनी सांगितलेली कथा ऐेकून माझ्या अध्यात्मिक ज्ञानात मोठी भर पडली. त्यांनी सांगितले, या परिसरात बाणासूर नावाचा एक असूर रहात होेत
ा. कुमारी असलेल्या कन्येकडूनच जीवनाचा अंत व्हावा, असा वर त्याने ब्रह्मदेवाकडून प्राप्त केला होता. दरम्यान शिवजींना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह करण्यासाठी पार्वती येथे तपश्चर्या करीत असताना देवी देवतांनी अविवाहित पार्वतीने बाणासुुराला ठार मारावी अशी विनंती केेली. शिवजी प्रसन्न झाल्यानंतर विवाह करण्यास तयार झाले. मात्र पार्वतीने अट ठेवली की भगवान शिवजींनी पार्वतीला पानांना शिरा नसलेले बेलपत्र आणि

डोळे नसलेले नारळ आणून द्यावे. अर्थात या अटी पूर्ण करणे भगवान शिवजींना अशक्य नव्हते. दुसरीकडे शिव-पार्वतीचा विवाह झाल्यास बाणासुराचा वध होणार नाही, याची चिंता नारद मुनींना लागली होती. सुदैवाने भगवान शिव आले नाहीत आणि शिव-पार्वती विवाह झाला नाही. दरम्यान बाणासुराच्या मनात पार्वतीशी विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली. मात्र पार्वतीने नकार देताच बाणासुराने युद्धाचे आव्हान दिले. त्यानुसार पार्वतीने बाणासुराचा वध केला. कुमारी असलेेल्या कन्येने बाणासुराचा वध केल्याने या परिसराला कन्याकुमारी असे नाव पडले. एकंदरीत, श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.

बाळासाहेब शेटे माझा मोेबाईल- 9767093939

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..