नवीन लेखन...

समझोता (अंड़रस्टँड़ींग)

 कितीही राग, संताप आला तरी अंड़रस्टँड़ींग ही अशी एकच गोष्ट आहे कि, जिच्या साहाय्याने आपण आपल्या रागावर, संतापावर मात करु शकतो. हा समझोता आपल्या फँमिलीसोबत, समाजासोबत किंवा दुसर्‍या कोणत्याही व्यक्ती सोबत असु शकतो. खरं तर समजदारपणा हा व्यक्तीमध्ये जन्मताच असतो कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो सहजासहजी कोणामध्ये आणता येत नाही.अशा प्रकारचा स्वभाव प्राप्त होणं म्हणजे त्या व्यक्तिवर ईश्वराने केलेली क्रुपा असते.प्रत्येक व्यक्तीला आपण सुखी व्हाव असं वाटतं पण खरं सुख हे आपल्या मानण्यात आहे.कोणा-कोणाकड़े ईतक असुनही ती व्यक्ती सुखी नसते तर कोणा-कोणाकड़े काहीही नसताना ती व्यक्ती खुप सुखी असते.प्राप्त परिस्थीतीमध्ये समाधान माणनं म्हणजेच सुख शक्यतो कोणत्याही वस्तुचा मोह टाळावा पण ती वस्तु मिळविण्यासाठी प्रयत्न जरुर करावेत. कारण जगातल्या कोणत्याही व्यक्तीला आपण गरिब असावं दरिद्री रहावं असं वाटत नाही त्यासाठी त्या व्यक्तीने मेहनत करावी, प्रयत्न जरुर करावेत पण वाईट मार्गाचा वापर कधीही करु नये.
लग्नानंतर जवळ-जवळ ६० ते ७० टक्के लोकांचं आयुष्य बदलुन जातं त्याला कारणंही तशीच असतात. एखाद्या व्यसनी मुलाला चांगली संस्कारी, गुणी, समजदार मुलगी मिळाली तर ती त्याला सुधारु शकते त्याच्यामध्ये बदल घड़वुन आणण्याची ताकद तिच्यामध्ये असते कारण तिचा तिच्यावर विश्वास असतो. याउलट एखादया संस्कारी, गुणी, निर्व्यसनी, मुलास असंस्कारी मुलगी भेटली तर त्याच्या आयुष्यात काय बदल होईल सांगायलाच नको. आपण अनेक गरिब-श्रीमंत कुटुंब पहिली आहेत जशास तसा जोड़ीदार मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. चांगल्यास व्यक्तीस चांगला जोड़ीदार मिळाला तर त्यांचा संसार अगदी ईतरांची नजर लागण्यासारखा असतो. पण का याच्या उलट परिस्थीती असेल तर संसाराची अगदी राख रांगोळीच होते जिवन नकोसं वाटतं. माझे काही मिञ लग्नानंतर खुप खुष आहेत पण कहींची स्टोरी ऐकवत नाही ईतकी वाईट

अवस्था त्यांना लग्न केल्याचा पश्चाताप होतोय लग्नाच्या दुसर्‍या वर्षात जर का ही अवस्था असेल तर संपुर्ण आयुष्य माणसाने कशाच्या जिवावर काढ़ायचं यातुनच मग घटस्फोटासारख्या गोष्टी माणसाच्या जिवनात घड़तात. संसारामध्ये किंवा जिवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर समजदारपणा, विश्वास यासारखे गुण स्वताच्या अंगी लावुन घेतले पहीजेत संसाररुपी गाड़्याचं एक चाक ड़गमगत असेल तर दुसर्‍या चाकाने त्याचा समतोल साधला पाहीजे. ऐकमेकांच्या विश्वासाला तड़ा जाणार नाही याची दोघांनीही काळजी घेतली पाहीजे.कारण आई-वड़ीलानंतर ऐकमेकांचाच मोठा आधार असतो जवानी असेपर्यंत नाही पण म्हातारपणात काळजी घेणारं कोण नसेल तेव्हाच आपल्या जोड़ीदाराची किंमत आपल्याला कळते.कारण व्यक्ती म्हातार्‍या होतात पण त्यांचं प्रेम हे कायम तरुणंच असतं.

प्रमोद पाटील

— प्रमोद पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..