नवीन लेखन...

तरच कत्तलखाने बंद होतील !

वर्षानुवर्षे सुरु असलेली गोहत्या सहजासहजी बंद होईल, असे वाटत नाही. कारण सरकारनेच या धंद्याला राजाश्रय दिला असल्याने गायींची कत्तल अशीच सुरु राहील, अशी परिस्थिती आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटना आणि प्राणीमित्र संघटनांनी याविरोधात संबंधित कत्तलखाने चालकांसह थेट सरकारलाच जर न्यायालयात खेचले तर.. आणि तरच सगळीकडचे कत्तलखाने धडाधड बंद होतील. आपला देश कृषीप्रधान आहे. आपले राज्य तर सहकार आणि शेती फुलविणारी कार्यशाळाच आहे. राहिला प्रश्‍न नगर जिल्ह्याचा. तर काना, मात्रा, ऊकार, वेलांटी, अनुस्वार या व्याकरणाच्या कोणत्याच नियमांची गरज नसलेला अहमदनगर जिल्हा शेती, सहकार आणि धवलक्रांतीसाठी सर्वांचेच प्रेरणास्थान आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक छोट्या-मोठ्या शेतकर्‍यांच्या दारात किमान चार-दोन गायी तरी बांधलेल्या असतातच. सुदैवाने दुधाला चांगला भावही मिळतो आहे. अर्थात तो दुग्धउत्पादकांना परवडणारा नाही, हा भाग वेगळा. पण नगर जिल्ह्यात गायींची पैदास मुबलक आहे. मात्र दुर्दैवाची बाब ही की, याच गायींना कत्तलखान्यात नेऊन कापण्याचे प्रमाणही प्रंचड आहे. ऐतिहासिक नगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कत्तलखान्यांत शेळ्या-बकर्‍यांबरोबरच चांगल्या सुदृढ गायी कापल्या जातात. विशिष्ट एका भटक्या समाजाचे काही लोक गायी चोरुन त्या कत्तलखान्यांत विकत आहेत. शहरात अगदी जिल्हाधिकारी कार्यालयालाच लागून असलेल्या कसाईगल्लीत अनेक कत्तलखाने आहेत. यासंदर्भात ‘देशदूत’ने आवाज उठविल्यानंतर पोलिस आणि महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील कत्तलखाने बुरुडगाव परिसरात हलविण्याचे ‘नाटक’ सुरु झाले. मात्र या नाटकाचा पडदा वर जाण्यापूर्वीच येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. तेथील ग्रामस्था चा विरोधही नाकारण्यासारखा नाही. गाय ही हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते. तिच्या पोटात ३३ कोटी देवीदेवता निवास करीत असल्याचे आपल्याकडे म्हटले जाते. पवित्र धर्मग्रंथांतही तसा उल्लेख आहे. मात्र तरीही कत्तलखानेही सुरु आहेत, तेथे गायी विकण्याचे आणि त्या कापण्याचे पापही सर्रास सुरु आहे. नगरच्या कत्तलखान्यांतील बीफ मटन मुंबईमार्गे थेट सौदी अरेबिया आणि इतर देशांत निर्यात केले जाते. तसे पहायला गेले तर या सृष्टीवर मर्त्य मानवाची भूक शमविण्यासाठी पालेभाज्या, फळे, अन्नधान्ये, कडधान्ये आदी प्रचंड प्रमाणात आहेत. मात्र तरीही जीभेचे चोचले पुरविण्यासाठी माणसाला मटन आणि त्या अनुषंगाने दारु अशी ‘थेरं’ करावीशी वाटतात, हे वास्तव आहे. हा खरे म्हणजे संबंधितांना अधःपतनाकडे, नरकाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, याची बहुतेकांना जाणीवही आहे. मात्र तरीही खवैय्या वृत्ती असलेल्या माणसाला खायला गायीचे मटन लागते. राज्य आणि केंद्र सरकार या कत्तलखान्यांना परवानगीच कशी काय देवू शकते, असा प्रश्‍न एकाच्याही मनात का निर्माण झाला नाही, आणि झालाच तर यासाठी कोणी आवाज का उठविला नाही, हा मुख्य प्रश्‍न आहे. ही काही विशिष्ट एका धर्माविरोधी युद्ध पुकारण्याची परिस्थिती नाही. परंतू, एक निष्पाप जीव म्हणून गायीची हत्या थांबविण्यासाठी आपल्या सार्‍यांनाच कधीना कधीतरी पुढे यावेच लागेल.जाता जाता एक सांगावेसे वाटते. गायींची हत्या करणारे कत्तलखाने बंद करण्यासाठी अघोरी उपाययोजना हाती घेण्याची कोणाला काहीएक गरज नाही. विशिष्ट समाज बांधवांना ‘टार्गेट’ करण्याची तर अजिबात गरज नाही. गायींची हत्या थांबवायची जर तुमची मनापासून इच्छा असेल तर फक्त एक करा. आपल्या गायी या कत्तलखान्यांत न नेता गायींचा सांभाळ करणार्‍या प्रामाणिक संस्थांना त्या द्या. यातून तुम्हाला एकवेळ पैसे म ळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..