नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

जेवणाची बैठक कोणती ?भाग ३

पाय आणि मांडी दुमडुन जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत. दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते. टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(……. आणि पोट दिसतच नसल्याने किती […]

जेवणाची बैठक कोणती ?भाग २

पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ? त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे. आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून […]

जेवणाची बैठक कोणती ?भाग १

ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात. ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात […]

आहाररहस्य १६

जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच. ऊष्टे खाण्यात मोठा दोष, जंतु संसर्ग हा आहे. आपण पाणी […]

आहाररहस्य १५

जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे. मौन पाळणे ही कला आहे. बाहेर न बोलल्यामुळे आतमधे संवाद सुरू होतो. आणि मनाची ताकद जबरदस्त वाढते. कधीतरी अवयवांशी संवाद साधावा. आतमधे जागा किती आहे. घेतलेल्या आहाराने सारे अवयव […]

आहाररहस्य १४

आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे. नैवेद्य दाखवून सहा चवींनी सज्ज असलेले […]

नैवेद्य भाग ७

नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा ! जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते द्यावे. इथे अतिथीची कधीही जातपात बघीतली जात नाही हे विशेष ! ही संस्कृती ! आपल्याला वाढलेल्या अन्नातून सर्व पदार्थांचा मिळून एक घास होईल एवढे अन्न काढून बाजूला ठेवावे. […]

नैवेद्य भाग ६

नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत. जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल. जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल. […]

नैवेद्य भाग ५

अकाल मृत्युहरणम सर्वव्याधिविनाशनम, विष्णु पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।। तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं. त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा. तसेच अच्युतानंद गोविंद […]

नैवेद्य भाग ४

गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य. भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत “यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो” आता बरे आहेत, […]

1 40 41 42 43 44 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..