नवीन लेखन...

आहाररहस्य १४

आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे.
पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे.

नैवेद्य दाखवून सहा चवींनी सज्ज असलेले जेवणाचे ताट. वाट बघतंय, सुरवात करण्याची. !

मुख्य जेवणाला सुरवात करताना गोड पदार्थाने करावी. हा पदार्थ ताटात अगदी उजव्या बाजूला वाढावा, जेणेकरुन जेवताना उजव्या हाताला अगदी सहज मिळेल.

आता वरणभात जेवावा. त्यावर लिंबू पिळावे, म्हणजे रक्त वाढायला मदत होते. असे सुप्रसिध्द डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी एका व्याख्यानात सांगितले होते. की, डाळीमधील एक घटक आणि ताजे कापलेले लिंबू मिळून जी प्रक्रिया होते, त्याचा परिणाम म्हणून रक्त वाढायला मदत होते.

मधुर रसाचा वरणभात जेवत असताना मधेमधे आमटीचा भुरकाही मारावा. ऊसळ आणि भाज्यापण चाखून पहाव्यात. या आमटी, उसळ, भाजीच्या वाट्या पानाच्या उजव्या बाजूला असतात. ज्या चवीला तिखट आणि तुरट असतात.

हो, आणखी एक. जेवणात पुरेसा गोड पदार्थ जर असेल, तरच तुरट चवीच्या भाज्या खाव्यात, (केवळ डाएटींगच्या नावाखाली, तुरट चवीच्या भाज्याच खाण्याची हौस असेल तर, होणार्‍या वाताच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल.)

तोंडी लावायला चटणी, कोशींबीर, दही, लोणचे, पापड, असतातच. पण फक्त तोंडी लावण्यापुरतेच हे पदार्थ खायचे.
हे आंबट, कडू, खारट पदार्थ पानाच्या डाव्या बाजुला वाढलेले असतात.

पाणी जेवताना मधे मधे प्यावे. म्हणून तर ते सुद्धा डाव्या बाजुलाच ठेवलेले असते.

जे पदार्थ उजवीकडे वाढले जातात, ते जास्त प्रमाणात पोट भरतीचे खावेत.

आणि डाव्या बाजुचे पदार्थ प्रमाणात कमी खावेत. केवळ चव बदलण्यापुरतेच खावेत.
आणि चव निर्माण करण्यासाठी खावेत. बोटाने चाटून खावेत.

शेवटी सगळं चाललंय, खाण्यासाठी.
चवीने, चवीसाठी !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
14.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..