नवीन लेखन...

स्व.पं.पन्नालाल घोष बासरी वादक

स्व.पं.पन्नालाल घोष यांचा जन्म बंगाल मधील बारिसाल गावात ३१ जुलै १९११ साली झाला. त्यांचे व वडिल उत्तम सितार वादक होते. स्व.पं.पन्नालाल घोषजींनी त्यांच्या वडिलांकडून सतार वादनाचे शिक्षण घेतले. परंतू त्यांच्या लहानपणीच वडिलांचे देहावसान झाले. तरी सुद्धा पंडितजींचा सतार वाजविण्याचा अभ्यास चालू होता. परंतू एक दिवस पं.पन्नालालजींच्या स्वप्नात त्यांच्या वडिलांनी सांगितले की “सतार वाजविण्याचे बंद कर आणि बासरी वाजविण्याचे शिक्षण घे. त्यामध्ये तूला नक्की यश येईल व तूझी जगभर ख्याती होईल नाव होईल”. पं.पन्नाबाबूंनी आपल्या वडिलांनी स्वनात दिलेल्या आदेशा नूसार सतार वाजविण्याचे सोडून बासरी वाजवायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांचे जन्मगाव बारिसाल सोडून कलकत्यात आले.

अनेक गुरूंकडून अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या पण ते खरोखर स्वयंभू संगीतकार होते. कलकत्याच्या रामचंद्र बोराल यांच्याकडून ते फिल्मि संगीत वाद्यवृंद चालन शिकले. उस्ताद खूर्शीद महमद खाँ यांच्याकडून शास्त्रशुद्ध बासरीवादन शिकले. पं.गिरिजाशंकर चक्रवर्ती यांच्याकडून धृपदापासून ठुमरीपर्यंत अनेक गीतप्रकार शिकले. पण उस्ताद अल्लाउद्दीन खाँ साहेबांचा सर्वात जास्त प्रभाव त्यांच्या वादनावर झाला. सर्वांगाने वादनातील परिपूर्णता व कलेवरची निष्ठा ही वैशिष्ठं त्यांच्यामुळे पन्नाबाबूंमध्ये आली. असं ते स्वतःसांगत असत. देवेंद्र मुर्डेश्र्वर (जावई) हरिपाद चौधरी व्ही.जी.कर्नाड आणि रासबिहारी देसाई पन्नाबाबूंचे पट्टशिष्य. पुढे अनेक बांसरी वादकांनी त्यांच्या वादन शैलीचं अनुकरण केल.स्व.पं.पन्नालाल घोषबाबूंनी बासरी सारख्या वाघाला हिन्दुस्थानी संगितात एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिलं. सगळया संगीत सभेत आणि म्युझिक सर्कलस्च्या समारंभात बासरी वादनाचे जे काही कार्यक्रम होतात त्या सर्वांचे श्रेय आणि मुख्य कारण आहेत स्व.पं.पन्नाबाबू.

वर्षानुवर्ष लोकसंगीतात वापरल्या जाणार्या या पारंपारिक वाघाला पं.पन्नाबाबूंनी मैफलीचा वाघ म्हणून प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि बासरीवर केलेले क्रांतीकारी संशोधन हे फार मोठं कार्य होतं. त्यांनी बासरीची रचना आणि

तंत्र या विषयाचा खूप सखोल अभ्यास केला. अल्युनिनियम पितळ प्लॅस्टिक बांबू अशा विविध प्रकारांपासून तयार झालेल्या बासर्यांचे नादगुण तपासून पाहिले. त्यांचे वेगवेगळे आकार लांबी रूंदी त्यावरील छिद्रांची संख्या याबाबत सतात प्रयोगात्मक अभ्यास केला. त्यांत बांबूपासून तयार झालेली बासरीच आधिक भावली. ख्यालगायकीच्या अंगाने बासरी वादन हे त्यांच्या वादनांच वैशिष्ठय होतं. म्हणूनच त्यांनी तयार केलेली खर्जाची बासरी हे सुद्धा त्यांचं महत्वाच संशोधन होतं. तिला फक्त चारच छिद्र होती. त्यावर मंद्र पंचम मध्यम गंधार ऋषभ आणि मंद्र षडजही (खर्ज) वाजवता येत असत. मल्हार तोडी दरबारी मारवा यांच्यासारखे पूर्वांगप्रधान व गंभीर प्रकृतीचे रागही तितक्याच परिणामकारक रीतीने वाजवता यावेत हा त्यामागचा उद्देश होता. त्यांनी बासरीची लांबी बाढवून ३२ इंच (४८से.मी.) केली. बासरीच्या अगदी शेवटच्या टोकाला आणखी एक छिद्र त्यांनी वाढविले. त्यामुळे स्वरांची मर्यादाही वाढली आणि खटके हरकती मुर्की असे उपशास्त्रीय संगीताच्या बाजाला अनुकूल स्वरालंकार सहजपणे वाजवता येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या वादनात ठुमरी कजरी सारख्या गीत प्रकारांचाही समावेश असे.

कलकत्यात आल्यावर रामचंद्र बोराल या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाने त्यांना आपल्या वाद्यवृंदात सामील करून घेतले. कोलकत्यात असताना त्यांनी एका चांगल्या हार्मोनियम वादकाकाडून हार्मोनियमही शिकून घेतले. श्री गिरिजाशंकर चक्रवर्ती या गायकाकडून कंठ संगीत शिकण्यास सुरूवात केली आणि गिरिजाशंकर जे त्यांना कंठ संगीत शिकवीत ते सर्व बासरीवर वाजविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असत. त्यांची कल्पकता खूप सुंदर होती व ते थोडया थोडया संगीत रचनासुद्धा करायला लागले होते. त्यांच्या या रचना ऐकून सेवाईकलाचे महाराज कुमार यांनी पं.पन्नाबाबूंना नृत्यपथात संगीत दिग्दर्शक म्हणून नेमणूक करून त्या नृत्यपथका सोबत आठ महिने युरोपच्या दौर्यावर पाठवून दिले. प्रत आल्यावर १९३९मध्ये आपले नशीब अजमविण्यासाठी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांचे नशिबच बदलले. त्यावेळच्या बॉम्बे टॉकिजचे श्री हिमांशू राय यांनी पं.पन्नाबाबूंचे संगीतातील ज्ञान व बासरी वादन ऐकून त्यांची आपल्या बॉम्बे टॉकिजच्या फिल्म कंपनीत ‘संगीत दिग्दर्शक’ (Music Director) म्हणून नेमणूक केली.

दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर पहिला वाद्यवृंद निर्माण व संयोजन् करण्यासाठी पं.रविशंकरजींना नियुक्त करण्यात आले होते. काही वर्षा नंतर त्यांनी ही नोकरी साडली. पं.रविशंकरजीं नंतर त्या पदावर १९५६साली पं.पन्नाबाबूंची नियुक्ती या पदावर झाली. दिल्ली आकाशवाणी केंद्रावर नोकरीत असताना पं.पन्नालालबाबूंनी कित्येक संगीत रचना आकाशवाणी दिल्लीच्या वाद्यवृंदाकडून तयार करून रडिओवर प्रस्तृत केल्या व त्या लोकप्रिय सुद्धा झाल्या.

उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्या गायन शैलीवर आणि विव्दत्तेवर स्व.पं.पन्नाबाबूंची भक्ती बसली. गंडाबंधन शागीर्द होण्याचा व शिक्षण घेण्याचा त्यांचा विचार होता. परंतू नंतर त्यांना कळले की उस्ताद अल्लाद्दिंयाँ खाँ विद्यार्थ्यांकडून पैसे घेत नाहीत आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तर उस्ताद खूप रागावतात. काही वर्षा नंतर उस्ताद व पं.घोष बाबूंची १९४४ साली मुंबईमध्ये अचानक भेट होते. त्यावेळेस पं.पन्नाबाबूंची शागीर्द (गंडाबांध शागीर्द) होण्याची इच्छा उस्ताद अल्ल्लाद्दिंयाँ खाँ साहेबांकडे प्रकट करतात. पं.पन्न्नाबाबू उस्ताद खाँ साहेबांचे गंडाबांधतात व शिक्षणाला सुरूवात करतात.

कमावलेली शरीर संपदा ही त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली आणि मेहनतीनं टिकवलेली देणगी होती. याचा उपयोग त्यांना बासरी वादनात झाला. कारण माईक स्पीकरचं युग त्यावेळी नव्हतं. तरी त्यांच्या आडव्या बासरीची फुंक जबरदस्त ताकदीची होती. पण त्यात एक वेगळाच गोडवा होता. त्यांच्या बांसरीतून निघालेला सूर भावनेनं ओथंबलेला असायचा श्रोत्यांच्या ह्यदयाला भिडायचा. गायकी अंगानं वादन हे त्यांच्या वादन शैलीचं वैशिष्ठय होतं. दीपावली जयंत चंद्रमौळी आणि नुपुरध्वनी या त्यांच्या नव राग रचना अप्रतीम होत्या. त्यांची दोन बांबूची बासरी मनपसंद व आवडती होती. त्यांच्या दोनीही बासर्‍या पुण्यातील राज केळकर म्युझियममध्ये ठेवल्या आहेत.

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर नोकरीत असताना १९६० साली पं.पन्नालाल

घोष आपल्या सगळयांना सोडून कन्हय्याचे एक सुंदरसे लेण देऊन गेले. आजही बासरीचे स्वर ऐकल्यावर आपल्याला त्यांची आठवण येते.

जगदीश पटवर्धन

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..