नवीन लेखन...

शब्द, अक्षर, भाषा : पुन्हां चारोळी, मुक्तक

कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें  हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ;  पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ हे हलकेंफुलकें, light-weight, ( कांहींसें ‘थिल्लर’ )  नांव मुळीच suitable,योग्य वाटत नाहीं. चार ओळी अशा अर्थाचा शब्द हवा असल्यास ‘चतुष्पदी’ म्हणायला हरकत नाहीं. अनेक ‘चतुष्पदी’ असल्यास, ‘चारोळ्या’ म्हटलें जातें, त्याबद्दल अधिक न बोलणेंच बरें.

या पार्श्वभूमीवर, ‘मराठीसृष्टी’वर निलेश बामणे यांचें एक लघुकाव्य ‘चारोळी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेलें आहे, तें पहाणें योग्य ठरेल.  तें काव्य असें आहे –

‘कुत्री – मांजरी
जगतात स्वतःसाठी
जगा एकदातरी
समाजातील उपेक्षितांसाठी…’

किती गंभीर, विचारप्रवर्तक काव्य !  तें आपल्याला अंतर्मुख करतें , जीवनाबद्दल चिंतन करायला भाग पाडते. चार ओळींमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे, वा: !  श्री. निलेश बामणे यांना kudos !

पण अशा या अर्थपूर्ण, संजीदा ( गंभीर, serious) काव्याचें शीर्षक ‘चारोळी’ असें वाचून आपण ( किमान मीतरी) उंचावरून दण्णकन् खाली आदळतो. हें शीर्षक, मजकुराच्या महत्तेचा पूर्णपणें खात्मा करून टाकते ! या काव्याला ‘मुक्तक’ हें अभिधान द्यायला काय हरकत आहे ?, तें नांव योग्यच आहे. मुक्तक म्हणजे खरें तर ‘Stand-alone verse’. आणि हें लघुकाव्य ( आणि यासारखी इतर लघुकाव्यें ) stand-alone verse, स्वतंत्र काव्य आहेच.

अशी आणखी उदाहरणें देता येतील. जसें की, शिरीष पै यांच्या  ‘अज्ञातरेषा’ या नांवाच्या मृत्यूवरील लघुकाव्यांचा संग्रह.  सांगायला नकोच की, यातील प्रत्येक stand-lone लघुकाव्य गंभीर आहे. या लघुकाव्यांना कवयित्रीनें ‘चारोळी/चारोळ्या’ म्हटलेलें नाहीं, हें निश्चित. ( आणि,  कुणी जर तसें नांव देऊन म्हटलेच, तर तें योग्य ठरणार नाहींच ).

कोणी कदाचित असें म्हणेल  की, ‘संस्कृत व हिंदीत मुक्तक म्हणतात हें ठीक ; पण मराठीत आम्ही काय म्हणून असें शीर्षक वापरायचें ?’ याचें उत्तर  म्हणून मी महाराष्ट्र सरकारनें स्थापन केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’च्या २०१३च्या अहवालातील एक उतारा देतो . हा अहवाल, राज्य सरकारनें मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा म्हणून,  केंद्राला officially submit केलेला आहे. या समितीत रंगनाथ पठारे, हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसेकर प्रभृती मान्यवरांचा, तसेंच राज्य सरकारच्या संबंधित Departments चे संचालक / सचिव यांचा समावेश होता. हा उतारा मराठीची पूर्वज भाषा ‘महाराष्ट्री’ हिच्यात जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथाबद्दल आहे. तो असा –

उद्.धृत मजकूर  सुरूं  (Quote ) =

‘गाथासप्तती’  हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसर्‍या शतकातील मुक्तकांचा ( द्विपदी, गाथांचा) संग्रह आहे. ……. ‘गाथा’  लोकप्रिय छंद किंवा वृत्त आहे.

= उद्.धृत मजकूर  समाप्त  (Unquote )

[ वरील उतार्‍यात ‘मुक्तक’ या शब्दाला दिलेला  Bold Type माझा ] .

अशा मात्तबर समितीनें ‘मुक्तक’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. यापेक्षा अधिक athoratative भाष्य कुणी करायची जरूरच नाही. हें स्पष्ट आहे की, मुक्तक’ हें कांहीं ( चन्द, a few) पंक्तीचें stand-alone  लघुकाव्य आहे (दोन-तीन-चार वगैरे ) ; आणि, हा शब्द मराठीत रूढ आहे. [ कुठल्याही  stand-alone लघुकाव्याला  मुक्तक’ असें संबोधण्यात theoritically प्रत्यवाय नाहीं ; मात्र हल्ली साधारणतया चार ओळींच्या लघुकाव्याला, चतुष्पदीला, ‘मुक्तक’ म्हटलें जातें, एवढेंच  ] .

आपण ‘Lyric’ ला ‘भावगीत’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला ( हा शब्द फक्त मराठी व कन्नडमध्येच आहे).  Free-verse ला ‘मुक्तकाव्य’ असा शब्द आपण योजायला लागलो. तर मग stand-alone गंभीर प्रकृतीच्या लघुकाव्याला आपण आधीपासून प्रचलित असलेला ‘मुक्तक’ हा सुंदर शब्द वापरला, तर काय काय हरकत आहे ?

सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.

— सुभाष स. नाईक   
Subhash s. Naik

 

 

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..