नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौपन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 9

वस्त्र हे लज्जा रक्षणासाठी असते, असा मंत्र आहे.
सर्वभूषाधिके सौम्यं लोकलज्जानिवारणे.
सर्व भूषणामधे श्रेष्ठ असलेली, लज्जा निवारण करणारी वस्त्रे मी तुला अर्पण करीत आहे. असा उपचार म्हणून सांगितला आहे.

वस्त्र ही फॅशन असली तरी एकवेळ चालेल, पण लोकांनी फक्त माझ्याचकडे पाहिले पाहिजे असे कपडे नकोत. जैन दिगंबर साधू देखील कपड्यांशिवाय वावरतात, त्यांचे वावरणे कुठेही किळसवाणे वाटत नाही, उलट, मला टीचभर कपड्यांची पण गरज नाही, एवढा परित्याग मी माझ्या मनात मान्य केला आहे, असे समजून येते.

मनामधे लाज वाटणारे, भावना चाळवणारे, कपडे परिधान करताना आपण सामाजिक आरोग्य बिघडवीत आहोत, हे पण लक्षात येत नाही. बरे झाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या निरोगीपणाच्या व्याख्येत सामाजिक हा आणखीन एक स्वतंत्र मुद्दा घेतला आहे. हे सामाजिक आरोग्य म्हणजे फक्त साथीच्या रोगापुरते मर्यादित नाही, हे पण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात शरीराकडे पहाण्याची पाश्चात्य दृष्टी वेगळी आणि भारतीय दृष्टीकोन वेगळा आहे, हे मान्य केलेच पाहिजे.

भारतीय संस्कृती मधे कपडे थोडे ढगळ, सैल, हवेशीर असतात. याचे कारण येथील हवामान आणि तापमान. पाश्चात्य वकील काळा कोट घालतात, म्हणून भारतातील वकील देखील काळा कोट घालतात, ही अजून शिल्लक राहिलेली गुलामगिरी नव्हे काय ? भारतात पांढरा सदरा आणि सैलसर पायजमा असा भारतीय पोशाख का होऊ शकत नाही? वस्त्र ही देशातील वातावरणाला अनुकुल असावीत. बंद गळ्याचा काळा कोट, टाय, साॅक्स, ग्लोव्हज, बूट हा अति थंड हवेतील योग्य पोशाख आहे. पण असाच पोशाख हट्टाने भारतात घातला तर चालेल का ? नाही ना ! तरीसुद्वा आज भारतात असाच पोशाख हवा असे वाटणे ही मानसिक गुलामगिरी आहे, असे वाटते.

यंत्राच्या जवळ काम करताना कपडे सैल ढगळ असून चालणारच नाही. तिथे अंगाबरोबर बसणारेच कपडे आवश्यक आहेत.

थंडी, ऊन पाऊस वारा यांच्यापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. लोकांच्या विकृत नजरापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. केवळ महिलांचेच कपडे असे असावेत असे नाही तर पुरूषांना देखील कपडे घालून सौंदर्य खुलवता आले पाहिजे.

कायदा करून आणि सेन्साॅर बोर्ड स्थापन करून हा प्रश्न मिटणारा नाही. माझी मुले कशी दिसावीत, माझी बहिण माझा भाऊ कसा दिसावा, त्याच्याकडे इतरांनी कोणत्याही विकृत नजरेने पाहू नये, असे कपडे त्यांनी घालावेत, हा किमान नियम प्रत्येकाने आपल्या घरापुरता पाळला तरी सामाजिक आरोग्य सांभाळले जाईल.

मी माझ्या दवाखान्यात तरी हा नियम म्हणून केला आहे. माझ्याकडे येणाऱ्या रूग्णांनी अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालू नये, असा फलक दर्शनी भागावर लावला आहे. आणि त्याची कडक अंमलबजावणी करतो. काहींनी याचा राग येतो, पण माझ्या रुग्णांनी माझ्याकडे कसे यावे हे ठरवण्याचा अधिकार घटनेने मला दिलेला आहे. तो अधिकार मी पूर्णपणे वापरतो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..