नवीन लेखन...

आहाररहस्य ६

आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता.
म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे.
एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही.

इथे प्रत्येकाचे वैशिष्टय़ वेगळे.
जसे बाहेरून वरवर दिसताना सर्वांचे शरीर सारखेच दिसते.
सर्वांनाच दोन दोन हात, पाय, डोळे, नाक, कान इ. तसेच आतील अवयव पण तसेच एकच ह्दय, एकच यकृत, आणि ते सुद्धा त्याच ठिकाणी, (नियमाला अपवाद असेलही, पण त्याने फार मोठा फरक नाही पडत.)

कल्पना करून बघूया,
प्रत्येकाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी असले असते, संख्येने कमी जास्ती असले असते, तर ?
आम्हा डाॅक्टर आणि वैद्य मंडळींचे काही खरे नव्हते.

आतून बाहेरून एवढी साम्यता ” त्याने ” देऊन देखील, शरीरशास्त्र समजून घ्यायची ही अवस्था, अगदी नाकी नऊ येतात, त्यात आणि प्रत्येकजण आतून बाहेरून वेगळा असता तर ???
छे छे कल्पनापण करवत नाही. हे एवढे साम्य बनानेवालेने दिया है, यही मेहरबानी है !
पण यात एक परीक्षा त्याने घेतलीच आहे.
आतून बाहेरून एवढे साम्य देऊनही, इथे प्रत्येकाच्या हातापायाच्या बोटांचे ठसे वेगळे.
केस आतून बाहेरून वेगळे.
डोळ्यांच्या बुब्बुळांची रचना वेगळी,
त्वचा वेगळी,
तसेच विचारही वेगळे,
पचनशक्तीही वेगळी
आणि होणारे परिणामही वेगळे.

एकता मे विविधता और विविधता मे एकता हेच ते खास वैशिष्टय़. ही सर्व त्याची कृपा.

या वेगळेपणाला प्रत्येकाने आपआपले समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे जे आहे, ते दुसर्‍याकडे असेलच असे नाही. किंवा जे जे इतरांकडे आहे, किंवा त्यांना जसा अनुभव त्यांना येतोय, तसा मला आलाच पाहिजे, असा अट्टाहास देखील नको.
मला दूध पिऊन त्रास होत नाही, म्हणजे दुसर्‍यांना पण होणार नाही, असे नाही.
आणि मला काकडी खाऊन सर्दी होते, म्हणजे इतरांना पण होईल, असेही नाही. इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.
प्रत्येकाचे हे वेगळेपण जपत चिकित्सा करणे, हेच तर वैशिष्टय़ आहे, आयुर्वेदाचे !

इतर चिकित्सा पद्धती आणि आयुर्वेदाच्या विचारसरणीमधे मूलभूत फरक आहेत, हा त्यातीलच एक.

म्हणून आयुर्वेद मतानुसार, एकाच कंपनीच्या, एकाच मिग्रॅच्या पॅरासिटामोलच्या कडू गोळीत आणि गोड सिरप यातील गुणांमधे आणि परिणामांमधे फरक पडणारच !

झोपताना एकाला गरागरा पंखा हवा असतो, तर एकाला डोक्यावरून पांघरूण घ्यायचे असते, तर एखाद्याला गरागरा पंखा फिरवत डोक्यावरून पांघरूण घ्यायला आवडते,
एकाला पंख्याचा वारा लागला रे लागला कि सटासट शिंका सुरू होतात, तर काही जण हेल्मेट शिवाय, बोडक्या डोक्याने, केसांची झुलपे उडवीत फिरत असतात, हे जसे प्रकृतीवर अवलंबून असते, तसेच ते सात्म्य असात्म्यतेवर पण अवलंबून असते. प्रयत्नांनी, अभ्यासाने, आपण सात्म्य असात्म्यता बदलवू शकतो, पण प्रकृती नाही.

माझं शरीर, एखाद्या गोष्टीला कसं मानवून घेतय, शरीरात कसं सामावून घेतंय, कसं पचवतंय, यालाच सात्म्यता म्हणतात. आणि जुळवून घेता येत नाही, ती असात्म्यता

आंग्ल भाषेत याच्याशी मिळता जुळता शब्द म्हणजे अॅलर्जी.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
17.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..