नवीन लेखन...

अभिनेत्री मर्लिन मन्रो

अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला.

खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच सुरू झाली होती.

हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. १९५३ मध्ये आलेला मेलोड्रामा चित्रपट ‘नियाग्रा’ मध्येम तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. १९५५ मध्येच आलेला ‘द सेव्हन ईयर इच’ या चित्रपटामध्येल तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. १९९९ मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टीचट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.

१९५३ मध्ये एका अनोळखी मासिकाचे संपादक ह्युज हेफनर यांना मर्लिनचा एक न्यूड फोटो मिळाला. मर्लिनने १९४९ मध्ये ते फोटोशूट केले होते. त्यांनी ५०० डॉलर मोजून एक फोटो खरेदी केला आणि तो त्यांच्या नव्या प्लेबॉय (Playboy) मासिकात छापला. त्यामुळे मर्लिन प्लेबॉय या मासिकाची पहिली मॉडेल ठरली. या फोटोशूटसाठी तिला फक्त ५० डॉलर इतकाच मोबदला मिळाला होता.

मर्लिनचा द सेव्हन इअर इच हा चित्रपट व तिचा या चित्रपटातील प्रसिद्ध सीन पाहिलेला मागील पिढीतील व्यक्ती विरळाच. हवेने उडणारा मर्लिनचा ड्रेस आणि तो सावरण्याचा तिचा प्रयत्न आणि त्यातच तिच्या चेहऱ्यावरील दिलखेचक अदा याने गेल्या काही पिढ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अनेक चित्रपटांमध्ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्यय कैद करण्याःसाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्या त सर्व सिनेतारिका फिक्या पडल्या. मर्लिनचा हा ड्रेस २०११ साली ५० लाख डॉलरमध्ये लिलावात विकला गेला होता.

चॅनेल पाच या फ्रेंच परफ्युमची मर्लिनने मोफत प्रसिद्धी केली होती. एका मुलाखतीत तिला, तुम्ही झोपताना काय परिधान करते असे विचारले होते. त्यावेळी तिने अत्यंत खळबळजनक उत्तर दिले होते. केवळ चॅनेल नंबर पाच चे पाच थेंब असे उत्तर तिने दिले होते. म्हणजेच तिने न्यू़ड (विवस्त्र) झोपत असल्याचेही मान्य केले होते. तिची मुलाखत चांगलीच गाजली होती. वर्षभरानंतर मर्लिनने एका परफ्युमसाठी न्यूड फोटोशूटही केले होते.

मर्लिनच्या चेहऱ्यावर असलेल्या ब्युटी मार्कबाबतही तो खरा होता की कृत्रिम अशा अनेक चर्चा आहेत. पण तसे असले तरी पोलका ड्रेसमधील मर्लिनचे रूप हे पुढील अनेक दशकांपर्यंत सौदर्याचे मूर्तिमंद उदाहरण ठरले. तिच्या ब्युटीमार्कची एवढी क्रेझ होती की अनेक दशकांपर्यंत मुली अशा प्रकारे ब्युटीमार्क चेहऱ्यावर गोंदून घेऊ लागल्या. त्याला तेव्हा मर्लिन्स मोल म्हटले जायचे.

१९६२ साली मर्लिनने मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांच्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे गाणे गायले. त्यावेळी ती “Happy Birthday, Mr. President” असे म्हणाली होती. तेव्हापासून केनडी यांच्या नावाआधी मिस्टर प्रेसिडेंट लावले जाऊ लागले. आजही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिस्टर प्रेसिडेंट म्हटले जाते. यानंतर केनडी यांनी स्वतः मर्लिनचे आभार मानले होते.
मर्लिनने प्लास्टीक सर्जरी केली होतो. यासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे २५६०० डॉलरमध्ये विकली गेली होती. त्यात तिने हनुवटी आणि नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख होता.

आरसपाणी सौदर्यासाठी अत्यंत कमी कालावधीत जगप्रसिद्ध अजालेल्या मर्लिन मनरो हिचे खासगी आयुष्य तेवढेच वादग्रस्त होते. तिने तीन विवाह केले होते. तिचे दोन पती तिच्याप्रमाणेच प्रसिद्ध होते. प्रसिद्ध बेसबॉलपटू जो डीमॅगिओ आणि आर्थर मिलर. तिचा डीमॅगिओबरोबर १९५४ मध्ये घटस्फोट झाला. त्याचवर्षी तीने मिलरशी विवाह केला. पाच वर्षे त्यांचे नाते टिकले. त्यानंतर पुन्ही तिचे आणि डीमॅगिओ यांच्यात नाते जुळल्याचे म्हटले जात होते.

तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट. मर्लिन मन्रो यांचे निधन ५ ऑगस्ट १९६२ साली झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..