पाणिनीची प्रतिज्ञा

आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण घेत होते. एकदा आचार्यानी सर्व शिष्यांना एक गृहपाठ दिला व दुसर्‍या दिवशी त्याची संपूर्ण तयारी करून द्यायला सांगितले. अनेक शिष्यांनी गृहपाठ तयार केला होता, मात्र काही शिष्यांची या ना त्या कारणामुळे गृहपाठाची तयारी झाली नव्हती. त्यामध्ये पाणिनीही होता. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य एकत्र आल्यावर आचार्यानी त्यांना गृहपाठाविषयी विचारायला सुरुवात केली. ज्यांचा गृहपाठ तयार नव्हता अशा शिष्यांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. छडी खाल्लेले शिष्य आपापल्या जागी जाऊन बसले. पाणिनीची वेळ आली तेव्हा त्यानेही आपला हात पुढे केला. त्याचा हात पाहताच आचार्य म्हणाले, ‘ अरे, तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही. मग तू कसला गृहपाठ करणार. जा तुझ्या जागेवर जाऊन बैस. ‘ असे म्हणून आचार्यांनी पाणिनीला छडीही मारली नाही. आचार्यांचे ते म्हणणे ऐकून इतर सर्वशिष्यांना हसू आले. पाणिनीला त्याचा भयंकर अपमान वाटला. त्याने तेथेच प्रतिज्ञा केली, की मी एवढा अभ्यास करेन, की माझ्या हातावर विद्येची रेषा काढीनच. त्यानंतर त्याने संस्कृत भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून ‘व्याकरणकार पाणिनी’ म्हणून नावलौकिक मिळविला.महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
572-sevagram-bapu-kuti

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा ...
p-539-harihareshwar-kalbhairav-temple-shiva-temple

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ ...
bhau-daji-lad-sangrahalay

भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय ...

Loading…

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*