चांगुलपणाचं मृगजळ

कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तात्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तोंड उघडले.

‘‘या जगात कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. आपल्याला नावं ठेवणारी एकही व्यक्ती या पृथ्वीवर निर्माण होऊ नये यासाठी मी आयुष्यभर काय नाही केलं? स्वत:च्या मतांना तिलांजली दिली, तत्त्वांना मुरड घातली, प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, प्रगतीची काळजी केली नाही व अनेकदा आर्थिक झळही सोसली. हे सगळं काही केलं ते केवळ एका गोष्टीसाठी. सर्वांनी मला चांगलं म्हणावं, कोणीही मला नावं ठेवू नये यासाठी. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वत:चं नुकसान करून घेतलं त्यांच्यापैकीच एकाने आज माझा ‘स्वत:ची मतं नसलेलं बिनबुडाचं भांडं’ असा उल्लेख केलेला ऐकून मला काय वाटलं असेल? या जगात आता जगण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ तात्या पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्याबद्दल कोणाचं वाईट मत असणं ही गोष्ट त्यांच्या कल्पनेपलीकडली होती. ते स्वप्नातही अशा ‘भयंकर’ घटनेचा विचार करू शकत नव्हते. आपल्याबद्दल सभोवतालच्या सर्वांचं मत चांगलंच असलं पाहिजे हा जगावेगळा अट्टाहासच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला होता.

असे आम्ही कसे? समाजात एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वांचं एकजात चांगलं मत असणं, टीका करणारी एकही व्यक्ती नसणं, उघड किंवा छुपा एकही शत्रू नसणं हे खरोखरच शक्य आहे का? या गोष्टी मानवीय प्रवृत्तीशी सुसंगत आहेत का? ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे व यशस्वी व्हायचं आहे त्यांना सगळी कामं मिशनरी वृत्तीने पार पाडावी लागतात व हे करीत असताना ते सर्वांना एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाहीत. कोणत्याही धडपड्या व यशस्वी व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतात व अशा शत्रूंचं त्या यशस्वी व्यक्तीबद्दल कधीच चांगलं मत नसतं. आपल्याबद्दल शत्रूंचं मत चांगलं नाही म्हणून यशस्वी व्यक्ती प्रगती करणे कधीच थांबवत नसतात.

या जगात सर्वांचं आपल्याबद्दल चांगलंच मत असलं पाहिजे यासाठी अविरत धडपड करणारी तात्यांसारखी माणसं सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात व शेवटी अपेक्षाभंगाच्या दु:खाने उद्ध्वस्त होतात. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या वाईट मतांना भीक घालण्यात अर्थ नसतो. अखेर सगळं जग सलाम करतं ते उगवत्या सूर्याला म्हणजेच यशस्वी व्यक्तीला !

— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.comमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 लेख
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*