नवीन लेखन...

वटसावित्री नावाचे विज्ञान !

Banyan Tree and Science

 

मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही हे जाणत्या पूर्वजांच्या लक्षात आल्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्बोधन करत बसण्याऐवजी युक्तीचा शोध सुरु झाला आणि त्यातूनच जन्मला वटसावित्री नावाचा एक अत्यंत उपयुक्त सण.

पुरुषांनी सरपणासाठी वृक्षतोडीसारखी व जंगल साफ करून शेती करण्यासारखी मेहनतीची कामं करायची पूर्वापार पद्धत असल्यामुळे इतर सर्व वृक्षांबरोबरच मानवासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वटवृक्षाचीही सर्रास कत्तल करण्यात येत होती. जे पुरुष वृक्षतोड करतात ते त्याचं संरक्षण करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्या थोर पूर्वजांनी ती जबाबदारी स्त्रियांवर सोपवली. माणूस पापभिरू असल्यामुळे ज्या वटवृक्षाच्या खोडाला धागे बांधून त्या वृक्षाची पूजा केल्याचे त्याने बघितले त्या वृक्षावर त्याने कधीही कुऱ्हाड चालवली नाही. माणसाची विज्ञानापेक्षा जप-तप,अंगारे धुपारे,देव, पोथ्या-पुराणं यांच्यावर जास्त श्रध्दा असल्यामुळे वृक्ष रक्षणाच्या या कृतीला सणाचं रूप देण्यात आलं आणि वटसावित्री नावाचा तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.

आपले सर्व सण हे पूर्णपणे विज्ञानाधिष्टीत आहेत, पण त्यांना हेतुपुरस्सर अंधश्रद्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे.

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..