योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी

काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या कुणीतरी….१

शून्यामधले कितीकजण,  शून्यची सारे अवतीभवती

परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२

आज हवे त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती

सहानुभूतीचा शब्द,  निर्माण करील सहनशक्ति….३

क्षीण होता दृष्टी,  दिसेल कां धडपड

श्रवणदोष येण्यापूर्वी,  ऐकून घे दु:खी ओरड…४

चपळ सारे अवयव असता,  धावपळीचे जीवन बघ तू

संगे जावून जाण त्यांचा,  जगण्यामधला हेतू…५

जेव्हां असशील विंवचनेत,  लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती

कोण जगतो कसा काय ,  जाणून घेण्या सवड कुणा ती…६

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1700 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…