नवीन लेखन...

आभासी छताचे फायदे आणि तोटे कोणते?

मुख्य छताच्या थोडेसे खाली, सुंदर रीतीने सुशोभित केलेले असे आभासी छत किंवा फॉल्स सिलिंग आपण बरेचदा बघतो. मुख्य छताच्या थोडेसे खाली हुक्सच्या सहाय्याने, बहुतेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसने एक पातळ छत तयार करतात. मोठमोठी सभागृहे, वगैरे ठिकाणी असे छत असतेच पण हल्ली अगदी छोट्याछोट्या घरांमध्येसुद्धा आभासी छत घातलेले दिसते. आभासी छताचे फायदे तसेच तोटेही आहेत.

आभासी छताचा एक फायदा म्हणजे खोलीचे सुशोभीकरण. विविध कलात्मक पद्धतीने हे छत सजवले जाऊ शकते. सुंदर आकर्षक दिव्यांची रचना, कलात्मक देखावे, रंगसंगती यांच्या मदतीने सुशोभित केलेली अनेक छते आपण बघतो. अजून एक फायदा म्हणजे सभागृहासाठी, खोलीसाठी लागणारे वायरिंग त्या आड दडवता येते. वायर्सच्या जंजाळामुळे दिसणारे अस्ताव्यस्त दृश्य नजरेआड करता येते. आभासी छतामुळे खोलीचे एकूण आकारमानही कमी होते. त्यामुळे वातानुकूलन यंत्रावरील ताण कमी होतो. त्यामुळे विजेचा वापरही कमी करता येतो. पण काही तोटेही आहेत बरे का. बरेचवेळा छताच्या आडचे दिसत नसल्यामुळे तिथपर्यंत पोचणे मुश्कील होऊन बसते आणि एखादे दुरूस्तीकाम करणे अत्यंत कठीण होते. कित्येक वेळा असे आढळले आहे की खूप ओल आल्याने किंवा पाणी गळल्याने किंवा कमी प्रतीचे ‘फास्त्रर्स’ वापरल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत धपकन खाली पडून प्रचंड नुकसान होते. आतमध्ये हळूहळू होत असणारे नुकसान बाहेरून दिसत नसल्याने एकदम खूप मोठा फटका पडतो. तसेच वाळवी, उंदीर वगैरेंनी सुरू केलेले नुकसान पण लवकर दिसत नाही.

आभासी छतासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरले तर ते छत फार जड होते. तसेच ओल आली तर ते पडतेही. मग हल्ली त्याऐवजी अल्युमिनियमचे पत्रे, प्लायवूड, अस्बेस्टॉसचे पत्रे किंवा हलक्या वजनाचे फायबरचे पत्रे ही वापरता येऊ शकतात. त्यात आणखी महत्वाचे म्हणजे छत टांगायला वापरलेले हूक्स. ते साधे न घेता उत्तम प्रतीचे ‘फास्नर्स’ घ्यायला पाहिजेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..