विश्रांती

धावपळीचे जीवन सारे,  मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,  दिसून येतो त्यातील अंत…..१

चैतन्यमयी जीवन असूनी,  चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,  मृत्यूची ते चाहूल पाही….२

थांबत नसते कधीही जीवन,  अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चिर निद्रा,  विश्रांती ही भास मनीचा….३

थकून जाई शरिर जेंव्हां,  प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,  घेई आसरा पुन्हा दुजाचा….४

आत्मा देखील थकून जाता,  परमात्म्याशी विलीन इच्छीतो
चैतन्यातूनी विश्रांतीचा ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो….५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1440 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…