नवीन लेखन...

वेगळा (कथा) भाग ८

आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती,

सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे  कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला,

“बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल.

“वाकड ला गेलो होतो” बाबू ने कूस वळवत आईला उत्तर दिल.

“तूला अस वाटत नाही , तू माझ्या काहीही न बोलण्याचा फायदा घेतोयस म्हणून”

“आई , अग तसं काही नाहीये” बाबू उठून बसला.

“मला सांग बाबू हे सर्व दादांना कळल तर” आई ने त्याच्याकडे एकटक पाहत विचारल.

“कस कळेल , तू सांगू नकोस ना”

“ बाबू , तुला मी ह्या आधी कधीही काही विचारल नाही , कारण तुझ्यात गैर वागण मी लहानपणापासून कधी पाहिलंच नाही,  पण बाबू, तू आज  खोट बोललास माझ्याशी, मी आज दुपार नंतर किती शोधल तुला , शेवटी तो अशोक दिसला संध्याकाळी, कुठेतरी डोंगरावर चालला होता , आधी आढेवेढे घेतले पण नंतर त्याने मला सांगून टाकल, कि तू वाकड ला गेलायस म्हणून, का, कशा साठी , मला सांगितलं असत तर मी कदाचित काही बोलले नसते तुला . पण मुळात तुला मला सांगावस का वाटल नाही बाळा” आई फारच काळजीत पडली होती

“ मी घाबरलो होतो आई , खरतर मला काही कळत न्हवत, मी तिकडे का गेलो, मी का अस ठरवलं . मला खरंच नाही माहित” बाबू आईला समजावण्याच्या स्वरात म्हणाला .

“मग , भेटली का बायडा, काही बोलली तुझ्याशी, काशिये ती ?”

“नाही भेटली, मी गेलो तसा परत आलो , खर सांगू का आई, कदाचित मला तिला भेटायचं न्हवतच , फक्त तिला कळू द्यायचं होत कि मी तिकडे येऊन गेलोय म्हणून “

“म्हणजे , अस का बऱ ?” आईच्या कपाळावर सूक्ष्म अटी  आली.

“माहित नाही  मला , आई मी झोपतो आता , उद्या शाळेत जायचय , आणि मला खरच खूप झोप येतेय” अस म्हणून बाबू आई कडे पाठ करून झोपी गेला.

आई ने बाबूच पांघरून सारख केल आणि देवा कडे हात जोडून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली , आणि झोपायला निघून गेली.

जवळ जवळ महिना- दीड महिन्याने बायडा परत तिच्या घरी आली.

घरी येताच ती बाबूच्या घरी गेली, बाबू तिच्या धाकट्या बहिणीला गणित शिकवत बसला होता , तिला बघून त्याला पुढे काय शिकवाव हे समजेना , शेवटी तो आपण नंतर अभ्यास करू अस सांगून बाहेर निघून गेला.

दत्त मंदिरात जाऊन बसला , पुस्तक वाचत असताना त्याच्या पुस्तकावर कोणाची तरी मागून सावली पडली , वळून बघतो तर बायडा उभी.

“ तू काहून आल्तास , वाकडला” बायडाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारल.

“असाच “ बाबू ने पुन्हा पुस्तकात लक्ष घातलं.

“असाच म्हंजी, झाला होता तेवढा तमाशा पुरा नाही झाला” बायडा उगीच रागवल्या सारख करत बोलली.

“हे बघ , मला काहीही तमाशा करायचा न्हवता , त्या दिवशी रात्री तुझ्या घरात जे काही झाल त्याच मला खूप वाईट वाटल , त्याच्या दुसर्याच दिवशी तुझ्याशी मला बोलायचं होत पण तू नाही भेटलीस तू निघून गेली होतीस वाकड ला , म्हणून मी तिकडे  आलो , तुझ्याशी बोलायला ,” बाबू सर्व  एका दमात बोलला .

“ काय बोलायचं होत , बोल आता” बायडा ने  विचारल.

“ मला वाटत बायडा , मी काय म्हणतो , ते तू  तू ते …….” बाबू  ला काय बोलाव ते सुचेना.

“ अर,काय … तू तू ते ते करतोयस , बोल कि घडाघडा” बायडा चिडली बाबू वर .

“ तू तू .. लग्न करशील माझ्याशी “ बाबू ने एकदाच विचारल.

“ काय्य, लग्न ,  तूझ डोक ठिकानावर हाय का “ बायडा भलतीच चिडली.

“ अग, माझ ऐकून तर घे” बाबू बिचार्रा सारखा तिच्याकडे बघू लागला .

“ काय, ऐकू, लग्न करतोय माझ्याशी , तोंड पाहिलं का आरशात “ अस बोलून ती अगदी तोऱ्यात निघून गेली.

बाबू तिच्या कडे केविलवाणा नुसता पाहत राहीला.

संध्याकाळी नेहमी प्रमाणे अशोक ची भेट झाली , त्याचा पडलेला चेहरा बघून त्याने त्याची विचारपूस केली..

“अशोक ,मला वाटत माझ्याकडून ना खूप मोठी चूक झालीये बहूतेक, जे मला बोलायला नको होत , ते मी बोलून बसलोय , आता मला त्या गोष्टीचा भयंकर पश्याताप वाटतोय.”

अशोकला  काही कळेना , “ काय झाल काय  इतक “त्याने विचारल.

“मी बायडाला लग्न करतेस का म्हणून विचारल.”

हे ऐकून अशोक खो खो हसत सुटला, त्याच हसून  होईस्तोवर  बाबूला  मात्र मेल्याहून मेल्या सारख झाल .आधीच त्याला घडून गेलेल्या गोष्टींमुळे अपराधीपनाची भावना मनात तयार झाली होती , आणि त्यात हा अशोक मगा पासून हसतोय. बाबुला त्याचा प्रचंड राग हि येत होता , पण गप्प राहण्या खेरीज काही पर्याय देखिल न्हवता.

शेवटी एकदाचा अशोक  शांत झाला,आणि म्हणाला,

“ तू  तर पार पुढचीच पायरी घाठलीस राव , हे तर माझ्याच्यानी पण झाल नसत”

“अरे पण बायडाची झालेली बदनामी पाहता तिच्याची कोण तयार होईल लग्न करायला”

“तीचा बाप उद्याच लग्न ठरवतोय का तीच “

“नाही , उद्याच कसा ठरवेल, म्हणजे निदान माझ्या कानावर तरी तसं काही आल नाहीये “

“ बावळट आहेस का रे तू जरा बाब्या , लग्न नाहीच ठरवत कोणी उद्या तीच  , मी तेच बोलतोय , तू का गेलास लगेच तिला विचारायला , त्या दिवशी इतका तमाशा झाला तेव्हा तर उंदरासारखा बिळात लपून बसलास”

“ ये अशोक , मी लपून बिपून काही बसलो न्हवतो, तू मूर्ख पणा केलास , फुकटचा आरडओरडा घसा कोरडा केलास जाऊन भर वस्तीसमोर ”

“अर , ते मी तुज्यासाठीच केल बाब्या , तुला हाय  का काहीतरी त्याच , ज्याच कराव भल,……तो …..”

“हा ,बस बस खूप भल केलस माझ , म्हणून लगेच आईला जाऊन सांगितलस ना मी वाकड ला गेलो होतो ते “

हे ऐकून मात्र अशोक गप्प झाला , उगीच विषय बदलायचा म्हणून ,

“ तू लग्नाचं विचारल्यावर काय बोलली रे बायडा तुला, लाजली असेल ना “

“ काय राव, लाजली बिजली काय नाय ,मला बोल्ली, तोंड पाहिलं का आरशात “ आणि बाबू पुन्हा केविलवाणा झाला .

“ काय्य्य. अस बोल्ली तुला , ती तर लय मोठी परवीन बाबीच लागून गेली नाही का , माझ्या मित्राला नाय बोलते , आख्या वस्तीत तुझ्या सारखा अभ्यासात हुशार आणि गुणी पोरगा शोधून सापडलं का बघ म्हणाव”

बाबू गप्पच होता , “ पण अशोक लग्नाचं उगीच विचारल रे मी , मला वाटत सगळ जरा घाईतच घेतलं मी  “

क्रमशः

— निशा राकेश गायकवाड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..