उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान
वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन

शेषशायीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल
उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल

शेषापरी वेटोळे असुनी,  ‘ नाळ ‘ तयाला म्हणती
क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती

बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग
जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग

‘ सो हं ‘ निनादुनी सांगे,  ‘ मीच तोच ईश्वर आहे ‘
चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे

विवीधतेनें सुचवी,   ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ सत्य ते
कां आम्ही धांवत असतो,  त्यास शोधण्या बाह्यांते

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1447 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…