माझ्या झेपावत्या पंखांना
तूरेशिमपाश बांधलास
नि त्यांनी वसा घेतला मायेचा — प्रेमाचा
आता या पंखांखालून
तू होऊ नकोस – रानभरी !
शस्त्रांचीच सवय होती
या माझ्या हातांना !
तू पेटत्या हातात फुलं दिलीस,
शस्त्रं आपोआप बोथटली
नि फुलांची वरमाला कधी झाली कळलंच नाही !
मी निघाले होते
स्वातंत्र्याचा पत्ता शोधीत
निखाऱ्यांचा वसा घेऊन
सोन्याच्या बेड्या तोडून
तू मला नजरकैद केलंस – तुझ्या प्रदेशात
थांब ! तुला जन्मठेप देण्यासाठी
मनाचा तुरुंग मीही खुला केलाय !
असा हसू नकोस
हा हात नाजूक आहे म्हणून….
या बोटांचा बंध
सोडवता येणार नाही – सात जन्म तरी !
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply