आजचं गुगल डूडल – दादासाहेब फाळके

p-46403-google-doodle-dadasaheb-phalke

गुगलने आज भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १४८ व्या जन्मदिवसानिमीत्त डूडल बनवून त्यांची आठवण  जागती ठेवली आहे.

दादासाहेब फाळकेंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल १८७० रोजी झाला.

दादासाहेब फाळके हे भारतातील पहिले चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक होते.  आपल्या १९ वर्षांच्या करिअर मध्ये त्यांनी ९५ चित्रपट आणि २७ लघुपट बनवले.

भारतात तयार झालेला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळक्यांनी बनवला.  त्यानंतर मोहिनी भस्मासुर,  सत्यवान सावित्री तसेच कालियामर्दन वगैरे चित्रपट बनवून त्यांनी आपली स्वतःची छाप भारतीय सोडली.

दादासाहेब फाळके यांचा जन्म महाराष्ट्रात नाशिक पासून 30 किमीवर त्र्यंबकेश्वर येथे झाला.   त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टस  मध्ये शिक्षण घेतले.  त्यानंतर त्यांनी बडोदा येथे कलाभवन मध्ये मूर्तिकला, इंजीनियरिंग, चित्रकला आणि फोटोग्राफी यांचे शिक्षण घेतले.  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर  ते मुंबईला आले.

मुंबईमध्ये काही दिवस त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यामध्ये काम केले.  त्यानंतर त्यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली.  प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यापूर्वी त्यांनी चित्रकार राजा रविवर्मा यांच्या बरोबर काम केले होते.  त्यानंतर त्यांचे लक्ष चित्रपट निर्मिती या एका वेगळ्या क्षेत्राकडे गेले आणि त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास बनवला.

भारतीय चित्रपट निर्मितीक्षेत्रात मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपट बनवून केली.  भारतीय चित्रपट व्यवसाय जगभरातील एक मोठा चित्रपट व्यवसाय मानला जातो.

नाशिक येथे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले

दादासाहेब फाळके यांच्याबद्दल माहिती वाचा मराठीसृष्टीच्या व्यक्तीकोशामध्ये 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…