नवीन लेखन...

‘अँटी-नॅशनल’ वरुन पत्रकारांच्या आक्रस्ताळेपणाचा कहर..

आक्रस्ळेतापणाचा कहर.. पत्रकार (?) आशुतोष

काल म्हणजे २२ फेब्रुवारीला रात्री, एका टी.व्ही. चॅनलवर पुलवामा-दहशती-हल्ल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल चर्चा होती. त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा मांडण्यांसाठी हें टिपण.

• क्रिकेटियर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोघांनीही असें मत व्यक्त केलें आहे की, वर्ल्ड् कप मध्ये भारतानें पाकिस्तानशी मॅच खेळावी, म्हणजे भारताला २ पॉइंट मिळतील आणि पाकिस्तानला पुढे जाण्यांपासून रोखता येईल, व तीच पाकसाठी शिक्षा असेल. ( हा विचार किती संकुचित आहे, हें मी माझ्या अन्य लेखात दाखवून दिलेलें आहेच). प्रस्तुत टिपणांत मुद्दा आहे तो त्या चॅनलवरील उपरोल्लिखित चर्चेचा.

• खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.

पण तेंही जाऊं द्या. मुख्य बाब आहे ती ही की , त्यानें अँकर अर्णब याच्या स्टेटमेंटस् कशा ट्विस्ट केल्या. खरें तर मला अमक्याच्या बाजूनें किंवा तमक्याच्या विरुद्ध असें बोलयचेंच नाहींये. मात्र, त्या आरडाओरडीत एक महत्वाचा मुद्याकडे अंकरचेंही दुर्लक्ष झालें, म्हणून तो मला इथें मांडावासा वाटतो.

• आशुतोषचा ओरडा काय होता, तर , ‘तुम्ही सचिन व सुनीलला अँटी-नॅशनल (व्यक्ती) असें संबोधायला तयार आहात काय ?’ . खरें तर, ते दोघे सद्.गृहस्थ अँटी-नॅशनल नाहींत, हें सर्वांनाच माहीत आहे, आणि कुणी तसा आरोपही त्यांच्यावर केलेला नाहीं. मात्र, पुढें जाण्यांपूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, आणि ती ही की, एखादी व्यक्ती अँटी-नॅशनल असणें आणि एखाद्या व्यक्तीची एखादी स्टेटमेंट अँटी-नॅशनल असणें , ( किंवा अगेन्स्ट् नॅशनल इंटरेस्ट् असणें ) या दोन गोष्टींमध्ये खूऽप फरक आहे. सचिन-सुनील जरी अँटी नॅशनल नसले, तरी ‘भारतानें पाकशी वर्ल्ड् कप मधील मॅच खेळावी ’ ही त्यांची स्टेटमेंट मात्र ‘अँटी नॅशनल’ म्हणून गणली जाऊं शकते ( मग, तिचें कांहींही जस्टिफिकेशन त्या दोघांनी दिलें तरीही). सचिन आणि सुनील अजूनही आपली ती स्टेटमेंट रिट्रॅक्ट् करूं शकतात.

• आशुतोष ती चर्चा सोडून निघून गेला, कारण आपल्या ओरडा निरर्थक आहे, हें त्याच्या ध्यानांत आलें.

मात्र अशाच मुद्यावरून सुधींद्र कुळकर्णींसारख्या व्यक्तीनेंही चर्चेतून निघून जावें, हें अनाकलनीय आहे.

खरें तर अँकरनें त्यांना व्यक्तिश: ‘अँटी नॅशनल’ म्हटलें नव्हतें. पण ‘मी अँटी नॅशनल आहे असें तुला म्हणायचें आहे कां, तें तूं मला आधी सांग, मगच मी बोलेन ’ हा कसला अन-जस्टिफाएबल् स्टँड ? तरीही अँकर म्हणत होता की, ‘आधी, तुम्हांला काय म्हणायचें आहे तें सांगा’. पण आपला दुराग्रह कायम ठेवत सुधींद्र ते चर्चासत्रच सोडून निघून गेले.

खरें तर सुधींद्र हे जबाबदार व्यक्ती वाटतात. ते आय्. आय्. टी. मधून ग्रॅज्युएट झालेले इंजीनियर आहेत. अटल बिहारी बाजपेयी प्रधानमंत्री असतांना सुधींद्र हे अटलजींच्या निकटवर्ती होते. आजही ते एक जबाबदार संस्था चालवतात. त्यामुळे, चर्चा सोडून निघून जातांना त्यांचा ‘एजंडा’ काय होता, याची कल्पना नाहीं. पण विचारान्तीं त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला नक्कीच समजायला हवें की, एखादी व्यक्तीच अँटी-नॅशनल असणें आणि एखाद्या व्यक्तीची एखादी स्टेटमेंट अँटी-नॅशनल असणें , या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे.

• आपण सार्‍यांनीच हा फरक ध्यानांत ठेवला तर समजुतीची गल्लत होणार नाहीं, आणि चर्चांना नको तो रंग येऊन त्या भरकटणार नाहींत. पाकिस्तान सरकार तर १९४७ पासूनच भारताशी वैर ठेवून आहे, कुरापती काढत आहे. म्हणूनच पुलवामानंतरचा जनतेचा संताप हा केवळ तात्कालिक समजूं नये. भारत सरकारनें अनेक दशकें तळ्यात-मळ्यात केलें. आतां तें ठोस पावलें उचलत आहे, तर जनता म्हणून त्याला सपोर्ट करणें हेंच आपलें सर्वांचें कर्तव्य आहे, न की , एक स्टेटमेंट व एक व्यक्ती यांत गल्लत करून भांडणें. राजकारणी कांहींही रंग देवोत, पत्रकार कांहींही ओरडा करोत, आपण मात्र अर्थावरूनची व्यर्थ भांडणें बंद करूं या.

— सुभाष स. नाईक

टिप्पणी – २३०२१९

२३.०२.१९

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 287 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

1 Comment on ‘अँटी-नॅशनल’ वरुन पत्रकारांच्या आक्रस्ताळेपणाचा कहर..

  1. मि ही मुलाखत पाहिली नाही. परंतु सुधींद्र कुलकर्णींंचे युलाखत सोडून जाणे मलाही बुचकळ्यात टाकणारे वाटले. अँटी नेशनल या शब्दाची व्याख्या करण्याची गरज आहे असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..