सूड वलय

उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता

रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता

मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला

पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला,

धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली

अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली,

जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला

समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला,

वाम मार्गी जावून त्याने,  तेच धन पुन्हा कमविले

सूड घेतला असून देखील,  समाधान ते नाही लाभले

दुष्ट वृत्तीची वलये ती,  फिरत असती सभोवती

सूड अहंकार लोभही,  त्यानाच गतीमान करती

एका वरचा राग तुम्ही,  फैलविता सहजपणे

तोडून टाका ही वलये,  प्रेम दया या भावनेनें

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1903 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..