नवीन लेखन...

आओ खेले ‘मेंढीकोट’चा अर्थ

‘बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले ‘मेंढीकोट’..’ हे मुंबंईतील दादर, माटुंगा, वांद्रे परिसरातील रस्त्याकडेच्या भिंतींवर गेल्या वर्षभरात रंगाच्या स्प्रेने लिहिलेलं आढळून येणारं आणि कोणताही आगापिछा नसणारं, शहर वासीयांमधे संभ्रम निर्माण करणारं एक गुढ संदेशात्मक वाक्य..! मी पाच-सहा महिन्यांपूर्वी यावर एक आर्टीकलही लिहिलं होतं.

२ एप्रिलला माझं आर्टीकल वाचून एबीपी माझा’ या मराठी चित्र वाहिनीने यावर एक स्पेशल रिपोर्ट केला होता. यात त्यांनी माझी बांईटही घेतली होती.. हे वाक्य दिसतं तेवढं सरळ नसावं असा मला वाटत होतं आणि या वाक्याचा संबंध ड्रग्सशी(मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ) असावा मला संशय होता आणि अद्यापही आहे..

‘एबीपी माझा’ वरची माझी बाईट पाहून मला या वाक्याशी संबंधीत दोन क्लू माझ्या फेसबुक मित्रांकडून मला मिळाले.

माझी क्लिप ‘एबीपी माझा’वर फ्लॅश झाली आणि दुसऱ्याच दिवशी,  मला श्री. पुष्कर पुराणिक या फेसबुकवरील माझ्या परिचित स्नेह्यांकडून ‘मेंढीकोट’ या शब्दाची उकल झाली. त्यांना हा शब्द श्री. मधूर भांडारकर यांच्या ‘पेज ३’ या हिन्दी सिनेमात वापरलेला आठवत होता आणि म्हणून मला त्यांनी ही माहिती कळवली. नुसती माहितीच कळवली नाही, तर त्यांनी यू-ट्यूबवर तो सिनेमा शोधून मला त्या सिनेमाची लिंकही पाठवली. श्री. पुराणिकांची समाजाप्रती बांधीलकी असल्यानेच त्यांनी तो विशिष्ट सिनेमा शोधण्यात स्वत:चा वेळ खर्च करून मला सर्व तयार मटेरीयल पाठवून दिलं. श्री. पुराणिकांचे मी आभार मानतो.

मेंढीकोट’ हा सांकेतीक शब्द असून याचा अर्थ ‘लडकी’ किंवा ‘बाई’ असा आहे. जी माणसं स्वत:च्या कंडू शमनार्थ पैसे देऊन कुठे नवनविन बायका-मुली मिळतील का या शोधात असतात, ते लोक त्यासाठी ‘मेंढी कोट’ हा शब्द कोडवर्ड म्हणून वापरतात..ही चटकही ड्र्ग्ससारखीच असते. माझ्या काॅलेजच्या दिवसांत रस्त्यावरच्या टपोरी भाषेत टंच स्त्री करीता ‘मेंढी’ हा शब्द वापरात असलेला मला चटकन आठवला आणि लगेच मेंढीकोटची लिंक लागली. ‘आओ खेले मेंढीकोट’ हे भितींवरील वाक्य म्हणजे उच्चभ्रू वेश्याव्यवसायात असणारांसाठी संदेश असावा का, असा संशय आता येऊ लागलाय.

सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर रंगांच्या स्प्रेने लिहिलेल्या अशा वाक्यांना ‘ग्राफिटी’ म्हणतात. आफ्रिकन देश किंवा पाश्चात्य देशांत अश्या ग्राफिटी मोठ्या प्रमाणात दिसून येतात..

‘पेज ३’ या सिनेमाची लिंक सोबत देत आहे. त्यातील ४१.२५ मिनिट ते ४२.२५ मिनिटं अश्या एक मिनिटाचा सिनेमा आपण पाहिल्यास आपल्याला मेंढीकोट शब्दाचा अर्थ समजेल.

सिनेमाची लिंक-
https://youtu.be/cxXNUZtHV8M

दुसरी माहिती हा संदेश लिहिणाऱ्याविषयीची मिळाली. हे गुढ संदेशात्मक किंवा निमंत्रणात्मक वाक्य लिहिणाऱ्या व्यक्तीचं नांव ‘अमरोज शिव कुमार’ असून तो ‘ॲमेझाॅन’ कंपनीचा डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. त्याचा कामाचा परिसर दादर, माटुंगा, वांद्रे, वडाळा असाच असून, याच परिसरात हे वाक्य लिहिलेलं आढळतं. ही माहिती ‘एबीपी माझा’च्या फेसबुक पेजवर कुणी RK Sule नांवाच्या व्यक्तीने शेअर केली आहे. हा जो कुणी अमरोज शिव कुमार आहे, त्याने हे संशय निर्माण करणारं वाक्य लिहिण्यामागे त्याचा उद्देश काय, हे मात्र श्री. सुळे यांनी सांगीतलेलं नाही. कदाचित त्यांनाही ती माहिती नसावी. श्री. सुळेंचा मला कोणताही परिचय नाही.

‘पेज ३’ या सिनेमात सांगीतलेला ‘मेंढीकोट’चा अर्थ आणि या वाक्याचा खरोखरंच काही संबंध आहे का आणि अमरोज ह्या व्यक्तीचा मेंढीकोट खेळण्यासाठी रस्त्यावर गुढ निमंत्रण लिहिण्याचा उद्देश काय, याची शहानिशा संबंधीत यंत्रणांनी करुन घ्यायला हवी.

— © नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..