नवीन लेखन...

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – १

The History of Agriculture in America - Part-1

भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. त्यातील शेतीच्या वापरासाठी असणारी जमीन, अमेरिकेत ९,३८० लाख एकर तर भारतात ४,०५० लाख एकर एवढी आहे. म्हणजे अमेरिकेच्या एकूण जमिनीपैकी साधारण ४१% जमीन शेतीसाठी, तर भारतात सुमारे ५१% जमीन शेतीसाठी वापरली जाते. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्मस आहेत तर भारतात हीच संख्या १२०० लाख आहे. भारतात एवढया प्रचंड मोठया प्रमाणावर फार्मस असण्याचे कारण म्हणजे आपल्या फार्मसचे छोटे आकार. सर्वसाधारण अमेरिकन फार्मचे क्षेत्रफळ आहे ४१८ एकर्स तर भारतात हाच आकार घटून होतो ३.३ एकर्स. त्यात पुन्हा वंशपरंपरेने वडिलोपार्जित जमीन मुलांमधे विभागली जात असल्यामुळे, दर पिढीमागे फार्मसचा आकार अधिकच लहान होत चालला आहे. शिवाय भारतात अनेक राज्यांमधे जमिनीसंदर्भाच्या कायद्यांनुसार, जमिनीच्या मालकी हक्कांवर बंधने टाकली आहेत. त्यामुळे अशा राज्यांमधे, जलसिंचित जमिनीवर १० ते २० एकर आणि कोरडवाहू जमिनीवर १५ ते ६० एकर, अशी मालकी हक्काची बंधनं आहेत.

आजमितीला भारतातले साधारण ६०% लोक शेती किंवा पशुपालनाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण केवळ २% आहे. शिवाय भारतीय शेती ही एकरी उत्पादनाच्या दृष्टीने, जगातील सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा देखील निकृष्ट दर्जाची आहे. भले दूध, तांदुळ, ऊस, गहू, शेंगदाणे, भाजीपाला, ह्या गोष्टींच्या उत्पादनात आपला जगात पहिला, दुसरा नंबर असेल, पण त्यात एकेका गायीच्या किंवा प्रत्येक एकरी उत्पादकतेपेक्षा, आपलं एकूण संख्याबळ (गायींची संख्या किंवा त्या धान्याच्या लागवडीखाली असलेले एकर्स) प्रचंड आहे, हीच खरी गोम आहे.

या पार्श्वभूमीवर, भारताच्या आणि अमेरिकेच्या शेतीचा तौलनिक अभ्यास करणं योग्य ठरणार नाही. अमेरिकन शेतांच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे आणि तुटपुंज्या मनुष्यबळामुळे, शेतीचं अधिकाधिक यांत्रिकीकरण ही गरज होती आणि आहे. या उलट भारताच्या टिचभर आकाराच्या फार्मसवर मोठी यंत्र सामग्री वापरणे हास्यास्पद होईल. शिवाय शेतीच्या आधारे उदरनिर्वाह करणार्‍या लाखो करोडो गरीब कष्टकरी जनतेच्या पोटावर पाय दिल्या सारखं ते होईल.

अमेरिकन फार्मस एवढे मोठे कसे झाले आणि त्यांच्यात काळानुसार कसे बदल घडत गेले ते बघणं थोडं मनोरंजक ठरेल. तसंच कष्टांना आणि उद्योजकतेला जोड देऊन, पुढच्या पिढयांच्या हातात शेतीची सूत्र सोपविण्यासाठी अमेरिकेत काय केलं जातं, ते पाहणं देखील योग्य ठरेल.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..