नवीन लेखन...

टर्मिनेटर २ – जजमेंटल डे

कॉलेज मधे असताना अगदी आ वासून पाहिलेला चित्रपट म्हणजे Sci-Fi हाॕलीवूड पट Terminator 2- Judgement Day.

कथा अगदी छोटीशीच.1984 मधे आलेल्या टर्मिनेटरचा हा सिक्वेल 1991 मधे आला होता.

साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा.

जॉनला त्याच्या टीन एज मधेच संपवण्यासाठी भविष्यकाळातून पाठवण्यात आलेला टर्मिनेटर T-1000 हा त्या दोघा मायलेकांना जंग जंग पछाडतोय. पण या नव्या व अतिशय ॲ‍डव्हान्स निर्वीकार चेहऱ्याच्या टर्मिनेटर (रॉबर्ट पॅट्रीक) समोर सुपर निर्विकार चेहऱ्याचा आपला जुना टर्मिनेटर (अर्नॉल्ड तात्या उर्फ अरविंद शिवाजीनगरकर) उभा ठाकतो आणि हा पूर्ण सिनेमाच एक उत्कंठावर्धक चेस बनून जातो.

यातलाच हा खुर्चीच्या टोकाला (edge of the seat ला काय म्हणतात हो..?) आणून बसवणारा हा चेस सिन म्हणजे चेस सिन्सचा बाप आहे. मोटरसायकल वरच्या जॉनचा पाठलाग T-1000 हा एका अजस्त्र ट्रक मधून करतोय. मेन रोड, सबवेज, पुलावरुन, पुलाखालून.. कुठेही जॉन जावो हा पठ्ठ्या पिच्छा सोडत नाहीय.

आणि मग काळ्या कुळकुळीत हार्ले डेविड्सन वर काळा गॉगल, काळा जॅकेट घातलेला तात्या येतो आणि एका थरारक चेसनंतर जॉनला मरता मरता वाचवतो असा हा सीन.

जेम्स कॅमेरॉन लिखीत दिग्दर्शित हा सिनेमा व पाठलाग कधीही न विसरता येण्याजोगा. वीस वर्षे झाली अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे. You tube मुळे आता कधीही पाहता येतो त्यामुळे प्रत्येकवेळेला तो पाहून मी अर्नॉल्ड तात्याला संगतोच
‘I will be back…!!’

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..