नवीन लेखन...

मुक्तीसाठीं

रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या दुजे नव्हते […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

जुळे

दोघे मिळून आलां हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम […]

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता  ‘अहं  ब्रह्मास्मि‘   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

रवि – उदयाचे स्वागत

उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे   //धृ//   उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे    //१// स्वागत करुया रविउदयाचे   रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]

बहिरा ऐके कीर्तन

गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत […]

1 14 15 16 17 18 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..