चारोळ्या

१   काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून   २   सारेच चोर  (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून   ३ माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा ।।१।।   जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी ।।२।।   मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।   कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी […]

चंद्राचे कायम स्वरूप

ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]

प्रेम झरा

नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।। वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।। कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।। कुणीतरी आहे पाठीराखा, आनंदाने  चालत रहा, […]

थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील […]

कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो, शेतामध्यें शेतकरी, समाधानाने मिळते तेंव्हा, त्यास एक भाकरी ।।१।।   त्याच भाकरीसाठी धडपडे, नोकर चाकर, कष्टामधूनच जीवन होते, तसेच साकार ।।२।।   कष्ट पडती साऱ्यांना, करण्या जीवन यशदायी, विद्यार्थी वा शिक्षक असो, अथवा आमची आई ।।३।।   अभ्यासातील एकाग्रता, यास लागते कष्ट महान, त्या कष्टाचे मोल मिळूनी, यशस्वी होईल जीवन ।।४।।   […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी, बघण्याची मज ओढ लागली, फुलूनी गेली बाग कशी ही, बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।   कल्पकता ही अंगी असूनी, दूरद्दष्टीचा लाभ वसे, अंधारातील दुःखी जनांची, चाहूल तुज झाली असे ।।२।।   शीतल करुनी दुःख तयांचे, जगण्याचा तो मार्ग दाखविला, सोडूनी सारे वाटेवरी, आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।   आस्तित्वाची चाहूल येते, […]

संत संगती

ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या […]

1 15 16 17 18