नवीन लेखन...

रसायनांची वर्गवारी

महाविद्यालयीन प्रयोगशाळेपासून, कोणत्याही प्रकारच्या प्रयोगशाळेशी संबंधित असणाऱ्यांना विविध प्रकारची रसायने वापरावी लागतात. या रसायनांची शुद्धता वेगवेगळ्या प्रकारची असते. ती शुद्धता कोणकोणत्या दर्जाची असू शकते, हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. तेव्हा विविध प्रकारच्या रसायनांची त्यांच्या दर्जानुसार कशी वर्गवारी केली जाते, याची ओळख करून देणारा हा लेख… […]

हे पण घेणार का?

एखादी गोष्ट आंतरजालावरून विकत घेतल्यानंतर सतत संगणकावर येणाऱ्या जाहिराती आणि आपल्या भ्रमणध्वनीवर सतत येणारे संदेश पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, मला काय हवे आहे, हे या लोकांना कसे कळते? याच प्रश्नाची एक उकल पाहणार आहोत आपण या लेखामध्ये… […]

संगणकाचे ‘शरीरशास्त्र’

संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच… […]

संगणकाचे पूर्वज

आज जवळजवळ सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर होतो आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सतत संगणकाचा वापर करतो आहे. त्या निमित्ताने, संगणकाची सोप्या भाषेत ओळख करून देणारी ही लेखमाला ‘पत्रिके’त वर्षभर प्रकाशित केली जाणार आहे. या अंकापासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील हा पहिला लेख अर्थातच संगणकाच्या ‘पूर्वजां’ बद्दलचा… […]

भारताचे यशस्वी अंतराळ उड्डाण….

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत. […]

फळे आणि भाज्या उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर

फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख… […]

भारतीय मुलूख मैदानी तोफ

सीमा संरक्षणासाठी स्वयंपूर्ण असणे कोणत्याही देशासाठी अत्यावश्यक असते. भारतही त्याला अपवाद नाही. संरक्षण संशोधन विकास संस्था आणि तिच्या अंतर्गत संस्था भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण बनविण्यात अग्रेसर आहेत. ओळख करून घेऊ ‘एटॅग्स’ या मुलूख मैदानी तोफेची…. […]

दशमान कालमापन आणि घड्याळे

कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे. […]

मोना लिसाचं गूढ…

लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा… […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..