नवीन लेखन...

तोंडावाटे द्रवरूप औषध घेताना घ्यावयाची काळजी

सोल्युशन (द्रावण), सिरप, लिंक्टस, सस्पेंशन, ड्रॉप्स (थेंब) अशा रुपात तोंडावाटे घ्यावयाची द्रव औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे सेवन करताना खालील काळजी घ्यावी. या औषधांचा योग्य डोस पोटात जाण्यासाठी बाटलीवरील मापाचा कप वा मापाचा चमचा वापरणे आवश्यक आहे. साधारणतः ही औषधे ५ मिलि. म्हणजे १ टिस्पूनच्या पटीत असतात. मापाच्या कप/ चमच्यावर ५ मिलि., ७.५ मिलि., १० मिलि. […]

औषधाचे सेवन करताना घ्यावयाची काळजी

औषधाचे गुणधर्म जपून ती टिकावू व्हावीत, त्यांचा शरीरात योग्य ठिकाणी परिणाम व्हावा व ती सुलभतेने घेताही यावीत यासाठी औषधे वेगवेगळ्या रुपात बनविली जातात. व (पातळ) औषधे, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, त्वचेवर लावायची औषधे, हुंगायची औषधे, अशी बहुरुपी औषधे आज आपण वापरतो. यातील बहुतांशी औषधे ही शरीरांतर्गत जाऊन रक्तात शोषली जातात व ईप्सित स्थळी (टारगेट ऑर्गन) जाऊन परिणाम […]

बाळासाठी खाद्य- कायदा

एक ते सात ऑगस्ट हा कालावधी ५५ जागतिक स्तनपान सप्ताह७७ म्हणून साजरा केला जातो. या संबंधात भारतामध्ये १९९२ साली कायदा संमत करण्यात आला आणि तो १ ऑगस्ट १९९३ पासून भारतभर अमलात आला- त्याचे शीर्षक ५५ बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजायच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन पुरवठा आणि वितरण-नियमन) कायदा १९९२७७ कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये-बालकांच्या दुधाचे पर्याय […]

मेद व मेदाम्ले

मागील भागात ओमेगा ३ ची माहिती दिली. ओमेगा ६ हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ओमेगा ६ हे लिनोलिनिक आम्लापासून तयार होते. मुख्यत्वे हे मधुमेहाने होणारे चेतातंतूंवरील परिणाम कमी करते. बाकी परिणाम ओमेगा ३ प्रमाणेच. भोपळ्याच्या बिया, पिस्ते, कोंबडीचे मांस, ऑलिव्ह, कपाशीच्या बिया, शेंगदाणे, करडई, तीळ, भाताचे तूस यांच्या तेलात ओमेगा ६ असते. मेदाचे पचन- तोंडातच सुरू होते. […]

स्तनांचे आजार

(अ) ‘स्तनांचे आजार’ या विषयाला अगदी तान्ह्या बाळापासून सुरुवात करू. काही बाळांच्या स्तनांमधून दुधासारखा चिकट स्राव निघतो. याला चेटकिणीचं दूध-विचेस मिल्क म्हणतात; पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपोआप कमी होते. मुद्दाम स्तनांना मालिश करून हे दूध पिळून काढण्याची प्रथा अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे सूज येऊन तिथे गळू होण्याची शक्यता असते. बिचाऱ्या बाळांना त्याचा अत्यंत त्रास […]

गुडघ्याचे प्रतिरोपण केव्हा ?

आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे […]

अंतःस्रावी ग्रंथी (पूर्वार्ध)

ज्या ग्रंथींचा स्राव नलिकेशिवाय थेट रक्तात उतरतो अशा ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी, शरीराचे सर्व व्यवहार नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथी बारा प्रकारच्या असतात. याचे सर्व कार्य रासायनिक संकेतावर शीघ्रतेने चालते. १) पियुषी ऊर्फ पोषग्रंथी (पिच्युइटरी) कवटीच्या आतील खालच्या भागात जतूक अस्थीच्या खड्यासारख्या भागात अधोअभिवाहीमस्तिषक केंद्राखाली (हायपोथॅलॅमस) ही ग्रंथी असते. आकार वाटाण्यासारखा, रंग गुलाबी, १.३ सें. मी. आकाराची ही […]

शीतपेयांचे दुष्परिणाम

आजची तरुण पिढी व लहान मुले पाण्याऐवजी कारबोनेटेड शीतपेय आवडीने पिताना दिसतात. अशा पेयात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर इतर अनेक द्रव्ये असतात. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रक्रियेसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही पाण्याची गरज इतर कोणतेही पेय भरून काढू शकत नाही. आपले शरीर पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही. म्हणून उष्मांक विरहित स्वच्छ जीवनदायी पाण्याचा […]

खांदा कडक होणे (फ्रोझन शोल्डर)

कडक खांदा होणे हे साधारणतः चाळीशीनंतर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. याची सुरुवात थोडयाशा खांद्याच्या दुखण्याने होते. पुढे पुढे रात्री दुखणे, खांद्याची हालचाल करणे कठीण होणे तसेच दिवसाही दुखण्यास सुरुवात होणे आणि नंतर संपूर्ण हातात दुखणे फैलावणे व सांधा संपूर्णपणे कडक होणे इ.मध्ये शेवट होऊ शकतो. याचे निश्चित कारण अजूनही कळलेलं नाही. म्हणून त्या दुखण्याला […]

खांदेदुखी (मध्यम वयातील)

मध्यमवयात खांदादुखीला सुरुवात झाल्यास अनेक कारणे असू शकतात. याही वयात खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारच्या संधीवाताच्या रोगामुळे खादा दुखू शकतो. अनेक वेळा मानेतील हाडात वयोमानाने होणाऱ्या बदलाने (स्पॉन्डिलेसिस) तसेच दोन मणक्यातील गादी सरकल्याने खांद्याच्या भागात तसेच खांद्याच्या आजुबाजूला दुखू शकते. पुन्हा पुन्हा एकच प्रकारचे छोटे वजन उचलण्याचे किंवा सुतारासारखे सतत हातोडा चालविण्याचे काम […]

1 2 3 4 5 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..