नवीन लेखन...

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा  […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं….१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची…२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले…..३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला….४, भाषेमधली शक्ती […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा  । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा  ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित  । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत  ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक  । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच  घटक  ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत  । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत  ।।   […]

जीवन गुंता

दोन रिळाचे दोन धागे,  एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही,  गुंफून परि गेले….१, गुंता झाला होता सारा,  निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता,  वेगळे होण्याचा….२, खेच बसता वाढत गेला,  होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते,  त्याला आता…..३, दोनच पर्याय होते,  त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे,   ह्या जगती….४, वेगळे होतील दोन धागे,  तुटून जाणारे अवशेष राहतील परि […]

भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।। निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।। भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।। ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच […]

1 15 16 17 18 19 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..