नवीन लेखन...

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल, देऊनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ? डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विनम्रता

लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी  । हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी  ।। लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी  । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी  ।। मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया   । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया  ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे  ।। जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती, जगणे हे आले  ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस  । जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते  ।। गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे  । नभास भिडता सुरताना, शब्द […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते फुलवित सारी जीवने पडेल प्रवाहीं कुणी लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो प्रवाही वेगाचे हे काम  ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या कल्पतरूची, आठवण काढती इतर ।।४।। […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक […]

त्यागवृत्ति

जीवनाच्या सांज समयीं  । उसंत मिळतां थोडीशी  ।। हिशोब केला स्वकर्माचा  । वर्षे गेली होती कशी  ।। दिवसामागून वर्षे गेली  । नकळत अशा वेगानें  ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।। आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहीले ।। ‘घेणे’ सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।। ‘देण्या’ मधल्या आनंदाला । मन […]

मेघ गर्व हारण

अंहकाराचा पेटून वणवा,  थैमान घातिले त्या मेघांनी तांडव नृत्यापरि भासली,  पाऊले त्यांची दाही दिशांनी…१, अक्राळ विक्राळ घन दाट,  नी रंग काळाभोर दिसला सूर्यालाही लपवित असता,  गर्वपणाचा भाव चमकला…२, पृथ्वीवरती छाया पसरवूनी,  चाहूल देई आगमनाची तोफेसम गडगडाट करूनी,  चमक दाखवी दिव्यत्वाची…३, मानवप्राणी तसेच जीवाणे,  टक लावती नभाकडे रूप भयानक बघून सारे,  कंपीत त्यांची मने धडधडे…४, त्याच वेळी […]

नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र) एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।। मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।। तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता,  श्वास […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे  । शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान   ।। भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी  । रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून  ।। देश-वेष वा जात कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली  । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी  ।। प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाते विसरत  । […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई नको, […]

1 14 15 16 17 18 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..