नवीन लेखन...

भारतीय रेल्वेचे पसरत गेलेले जाळं

इ.स. १८५३ मध्ये भारतीय रेल्वेचा शुभारंभ मुंबई ठाणे रेल्वेने झाला आणि त्यानंतर सन १८५४ मध्ये हावरा हूगळी मार्ग सुरू झाला. कलकत्त्यामध्ये १८४५ पासून रेल्वे उभारणीचे वारे वाहत होते. अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी पैसे उभारण्यास सुरुवात केली होती. इंग्लंड मध्ये भारतीय रेल्वेच्या वार्तेमुळे सर्व थरांतील नागरिक थक्क झाले होते. भारतात भारतीय रेल्वेने भांडवल उभारण्याकरिता काढलेले शेअर्स बाजारात हातोहात […]

ब्रिटिश राज, भारतीय रेल्वे आणि भारतीय जनता

ब्रिटिशांनी भारतीयांना रेल्वेने यात्रा घडवायला सुरुवात केली. तीर्थक्षेत्री घेऊन जाणाऱ्या रेल्वेने भारतीयांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. भारतीय यात्रेकरूंची नाडी ब्रिटिशांनी पकडली होती. विविध धार्मिक संस्थांना यात्रेकरूंची  ने-आण करण्यासाठी सवलती दिल्या. जगातील हा एकमेव प्रयोग भारतात पुढे कायमसाठी रुजला. […]

शिवधनुष्य बोरघाटाचं

बोरघाट बांधणीचे हे अवघड बांधकाम ब्रिटिशांनी कर्जत, पळसदरी ते खंडाळा आणि लोणवली (लोणावळा) ते खंडाळा असे दोन्ही बाजूंनी सुरू केले होते. हा घाट बांधण्याचा खर्च दर मैला मागे ६,६४,३७५ रुपये इतका, तर एकूण खर्च १,०५,००,२६७ रुपये इतका झाला. एका रुपया मध्ये ३५ ते ४० किलो तांदूळ मिळण्याचा आणि कारकुनाचा पगार आठ ते दहा रुपये आणि अधिकाऱ्यांचा पगार वीस ते पंचवीस रुपये महिना असण्याच्या त्या काळात हे खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे होते. […]

भारतीय रेल्वेची बांधणी

१८४३ साल उजाडलं. जगातली पहिली रेल्वे धावली त्याला अठरा वर्ष झाली होती. एव्हाना ब्रिटिश सरकारच्या गाठीशी युरोपियन रेल्वे बांधणीचा बराच अनुभव जमा झाला होता. तो अनुभव हाताशी घेऊन १८४३ मध्ये भारतीय रेल्वेच्या बांधणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष हालचाली सुरु झाल्या. जॉर्ज क्लार्क या ब्रिटिश इंजिनीअरने मुंबईजवळील भांडूप या खेड्यात काही प्रतिष्ठित व्यक्तींची सभा घेतली आणि त्या सभेत रेल्वेची स्थापना केली. […]

वेगवान युगाचा प्रारंभ

इ.स. १८०० ते १८२० यादरम्यान इंग्लंड या देशात रेल्वेमार्ग बांधण्याचे आराखडे आखले जात होते. प्रयत्नांना आकार येत गेले आणि १८२५ साली ३८ डब्यांची जगातली पहिली वाफेच्या इंजिनाची प्रवासी रेलगाडी इंग्लंडमध्ये स्टॉकटोन ते डार्लिंग्टन मार्गावर धावली. वाफेच्या इंजिनाचे जनक जॉर्ज स्टीफन्सन यांनी या गाडीचं उद्घाटन केलं. एका नव्या वेगवान युगाचा तो प्रारंभ होता, पण प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये मात्र रेल्वेच्या विरोधात मोठा गहजब माजला. […]

रेल्वेचा इतिहास

रेल्वेशिवायचं जग ही कल्पनाही आज अशक्य वाटते; पण रेल्वे अस्तित्वात नसण्याचाही एक काळ होता.   आश्चर्याची किंवा गमतीची गोष्ट म्हणजे, तो काळ `रेल्वेमुळे आपल्या सुरळीत, स्वास्थपूर्ण जगण्याचा घात होईल’ अशा भीतीदायक समजुतीचाही होता. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..