नवीन लेखन...

आईच्या ६५व्या वाढदिवशी..

‘आई’ ही… चिरंतन आशा अनादि नि सुदैवाने अनंत मानवी आयुष्याला मात्र मर्यादा दुर्देवाने! ही खचितच खंत देवाचा अंश, आई परीसस्पर्श लाभून अवघे आयुष्य पुलकित! खूप काही सांगायला फारसे शब्द लागत नाहीत तुमच्या आमच्या आनंदाला कारणं फारशी लागत नाहीत -यतीन सामंत

आपलं (च) म्हातारपण

म्हातारपण असतं नाजूक साजूक तापून निवणाऱ्या एका काचेप्रमाणे म्हातारपण असतं दुखरं ठुसठुसतं उगा सलणाऱ्या शब्दांच्या वेदनांगत म्हातारपण असतं थकलेलं शीणलेलं दाट कापडाच्या उसवत्या वीणीप्रमाणे मन असतं अस्थिर, भिरभिरणारं तरंगणाऱ्या एका नि:संग पर्णाप्रमाणे म्हातारे डोळे असतात हळवे थोड्याशा प्रकाशाने भिरभिरतात जराशा आपुलकीनेही पाझरतात किंचित तिरीपीने येते तिरीमिरी आधाराला अशावेळी लागतं कुणीतरी म्हातारपण एकटं एकटं असतं आतुरतेने वाटते […]

आठवणींची पिसं

आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा काहींचा केवळ नुसताच भास जवळून काहींचे जाणवतात श्वास काही रांगत्या काही रांगड्या मुकाट काही, काही अखंड बडबड्या काही गोड बोबड्या दुडदुडताना रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या कुजबुजती अस्पष्ट […]

आईच्या ६३व्या वाढदिवशी

वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर प्रणाम शतवार शब्दांना पहावा पेलतो का भावनांच्या आपला भार लखलखीत रहाव्या उजळीत या आयुष्याच्या ज्योती अमोलिक क्षण अनेक उधळीत आनंदाचे मोती -यतीन सामंत

साठाव्या आठवणी

आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे धुडकावून वर्तमानाचे सारे सावध […]

फळाची मजा

आंबा आहे फळांचा राजा मधुर रसदार हापूसची मजा फणसाला बुवा काटेच फार रसाळ पिवळा गरा मात्र चवदार केळी हिरवी, पिवळी किंवा वेलची पौष्टिक गोड, रोजरोज खायची द्राक्ष कशी घोसाला लगडलेली सुमधुर, टपोरी नाशिकवाली आईला म्हणावं फळं रोजच आण चवीला छान नि आरोग्याचीही खाण – यतीन सामंत

कुसुमाग्रजांना श्रद्धांजली

काजव्यांच्या कोलाहलातून भव्य तारा निमाला धरित्रीच्या कुशीमधून आसमंतात झेपावला कोंडलेला श्वास मुक्त झाला, उजाडलं घर अंगण सुनंसुनं झालं सुन्न, उसासलं अवघं तारांगण विध्दलेलं रुद्ध शब्द, श्वास का हा जडावला दाटली श्रद्धा ओठी, डोळ्यांकाठी मोतीहार निखळला – यतीन सामंत

काय गंमत आहे पहा!

आयुष्याचे कण कण क्षण साठले कुणी कोठल्या पेढीवरती व्याज राहो मुद्दलही होई झपाट्याने ती केवळ रिती खालती नसे पासबुक नसे स्टेटमेंट तुमच्या आमच्या शिलकीपोटी निर्वाणीची निर्वाणनोटीस येते अचानक जेव्हा हाती तेव्हाच उमगते (काय फायदा?) नव्हती उरली शिल्लक खाती -यतीन सामंत

नमनाचं तेल

करेन कोटी, करेन कोटी करेन कोट्या कोटी कोटी सांभाळीन त्या छातीच्या कोटी केवळ अस्सल एक ना खोटी सरस्वती थैमाने ओठी कोटीला मग कसली खोटी – यतीन सामंत

देता आणि खाता

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥ सत्तेवरल्या मंत्र्याकडून भले मोठे पोट घ्यावे मऊ मऊ खुर्चीसाठी डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥ गरीबशा लोकांकडून गरीबीची दु:खे घ्यावी पोटातल्या आगीसाठी हातचलाखी शिकावी ॥ २ ॥ भडकलेल्या आगीवरुन तडकण्याचा गुण घ्यावा भरलेल्याशा ‘खिशा’कडून आपला तेवढा ‘हप्ता’ खावा ॥ ३ ॥ मेलेल्याने मरत रहावे खाणाऱ्याने खात जावे […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..