नवीन लेखन...

सहल !

उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. ‘अल्ते कारे ते दोघे?’, म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे! […]

पुरून उरिन! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ५

खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर—! […]

मी व्यायाम करतो

‘ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..