नवीन लेखन...

सॅन डिआगो

हे लॉस एंजलीस पासून १२० मैलांवर तर आरवाईनपासून साधारण ३/४ तासाच्या अंतरावर आहे. त्याच्या दक्षिणेला मेक्सिकोची बॉर्डर लागते.

अमेरिकेतील ते एक अप्रतीम सौंदर्याने नटलेले शहर आहे. मुळात ते समुद्रानजीक आहे. तिथे अमेरिकेचा मिलिटरीबेस आहे. त्यामुळे त्याच्या आसपास नौका आणि युध्दनौका नांगरलेल्या आढळतात. आपण त्या नगरीत शिरतो तेव्हा एक उंच पूल लागतो. त्याला Coronado Bridge म्हणतात. त्याच्या खालून जहाजांची ये-जा चालू असते. सॅन डिआगोला पांढऱ्याशुभ्र वाळूंचे समुद्रकिनारे लाभलेले आहेत. तिथे बोटिंग, स्विमिंग करता येते. तिथे झू आहे. अनेक जाती चे पशू-पक्षी पाहायला मिळाल्याने बाळगोपाळमंडळी खूष होऊन जाते. अनेक बागा आहेत. त्यापैकी Balbola Park प्रसिद्ध आहे. या पार्कमध्येच सफारी घेता येते. या पार्कमध्ये ६५० जातीचे प्राणी आहेत. एकाच ठिकाणी इतके प्राणी पाहाण्याची पर्वणी ठरावी. खरेतर इथे कलांचे संवर्धन केले जाते. अनेक आर्ट्स गॅलरीज, आर्ट स्टुडिओज आहेत. इथे म्युझियमही आहे. शेजारीच Old Point Loma Light House आहे.

सॅन डिआगो हे एक महत्त्वाचे टुरिस्ट सेंटर म्हणता येते. त्यामुळे पर्यटकांनी ते सतत गजबजलेले असते. त्यांच्या राहाण्या-जेवण्याच्या सोयींसाठी मोठमोठी हॉटेल्स इथे आहेत. इतर पर्यटनठिकाणी असते तशी विमानसेवाही इथे उपलब्ध आहे.

अमेरिकेतील दाट लोकवस्तीच्या शहरांपैकी हे एक शहर आहे.

सॅन डिआगो हे मिलेटरीबेस असलेले शहर असल्याने शहराच्या आजूबाजूला नेव्हलशिप्स नांगर टाकून उभ्या असलेल्या दिसतात. नेव्हलशिप कशी असते, तिची कार्यप्रणाली कशी चालते यासंबंधी सामान्य जनांमध्ये नेहमी कुतूहल असते. ते क्षमविण्यासाठी USS Midway, an aircraft-carrier-turned museum असे एक जहाज किनाऱ्यावर उभी आहे. ती पर्यटकांना खुली असते. तिची सैर केली की नाविकदलाच्या कार्याची पर्यटकांना पूर्ण कल्पना येते.

या जहाज म्यूझिएमजवळच एक नाविक आणि त्याची प्रेयसी यांचा आपल्याकडे आरके स्टुडिओ चा जसा एम्लेम होता तसे जवळजवळ १००-१५० फूट उंच कटआऊट लावलेले आहे. या शिवाय ठिकठिकाणी धातूचे वेगवेगळे पुतळे अनेक ठिकाणी बसवलेले दिसतात.

समुद्रकिनाऱ्यांमुळे अनेक जेटी आणि त्यांच्या आसपास लहान मोठ्या खाजगी स्पीडबोटस् उभ्या असतात. सारे दृश्य विलोभनीय असते.

डॉ.अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..