नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बापू नाडकर्णी

रामचंद्र गंगाराम ‘ बापू ‘ नाडकर्णी यांचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी नाशिक येथे झाला. बापू नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर स्पोर्स्टमन होते, ऑल राऊंडर होते. ते कॉलेजमधून स्टेट लेव्हलला टेनिस खेळले. क्रिकेट खेळतच होते. नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळले, खो-खो, टेबल टेनिस हे सर्व खेळ खेळले. इतकेच नव्हे ते अभ्यासामध्येही ग्रेट होते. त्यांना इंटर सायन्सला गणित या विषयामध्ये २०० पैकी २०० मार्क मिळाले.

१९५०-५१ मध्ये बापू नाडकर्णी पहिल्यांदा क्रिकेट खेळले ते ते पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी. पुढल्याच वर्षी ते महाराष्ट्राकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. दोन वर्षांनंतर त्यांनी मुंबईला ब्रेबॉर्न स्टेडियम येथे मुंबई विरुद्ध पहिले शतक केले. तेव्हा त्यांनी नाबाद १०३ धावा केल्या.

बापू नाडकर्णी यांची १९५५-५६ मध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध फेरोजशहा कोटला मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये निवड झाली. त्यावेळी त्यांनी नाबाद ६८ धावा केल्या त्यावेळी ते धावचीत झाले आणि दोन्ही इनिंगमध्ये त्यांनी एकूण ५७ षटके गोलंदाजी केली तेव्हा त्यांना एकही विकेट मिळाली नाही.

बापू नाडकर्णी यांची गोलंदाजी खेळणे हे काही सोपे काम नवहते कारण, त्यांचा चेंडू इतका परफेक्ट असे की गोलंदाजाला खेळणे आणि मोठा फटका मारणे अशक्यच होत असे. त्यावेळी असे म्हटले जात असे की ते खेळपट्टीवर नाणे ठेवून बरोबर त्यावरच सतत चेंडूचा टप्पा टाकण्याचा सराव करत असत. त्यांच्या गोलंदाजी सरासरी कधीकधी २ पेक्षाही कमी असे.

बापू नाडकर्णी यांची खरी ओळख द्यायची झाली १९६३-५४ मध्ये इंग्लंड विरुद्ध मद्रास येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या वेळची द्यावी लागेल. त्या कसोटी सामन्याच्यावेळी तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे ब्रायन बोलूस आणि केन बॅरिंगटन यांच्या फलंदाजीच्या वेळची द्यावी लागेल. त्या दिवशी बापू नाडकर्णी यांनी २९ षटके टाकली त्यामध्ये २६ षटके निर्धाव टाकली आणि फक्त तीन धावा दिल्या. त्यांची गोलंदाजी संपली तेव्हा आकडे असे होते ३२ षटके त्यामधील २७ षटके निर्धाव आणि फक्त ५ धावा. ह्यावेळी त्यांनी लागोपाठ २१ षटके निर्धाव टाकली त्यामध्ये लागोपाठ १३१ डॉट बॉल म्हणजे लागोपाठ १३१ चेंडूवर एकही धाव फलंदाजाला घेता आली नाही, ते सतत ११४ मिनिटे गोलंदाजी करत होते आणि समोर फलंदाजही साधेसुधे नव्हते. त्यावेळी त्या फलंदाजची काय अवस्था झाली असेल याचा विचारही आपण करू शकणार नाही. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू वासू परांजपे गमतीने म्हणतात,” बापू नाडकर्णी त्यावेळी गोलंदाजी करत असताना एकच फिल्डर ठेवला असला तरी चालले असते, तो म्हणजे बापूना चेंडू परत आणून देण्यासाठी, विकेटकिपरला आणि इतर फिल्डरला काहीच काम नसणार त्यावेळी?” बापू नाडकर्णी यांना मी अनेकवेळा भेटलो आहे परंतु हा त्यांचा विक्रम मी एका चेंडूवर त्यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्याकडून लिहून घेतला आहे. जर असा रेकॉर्ड पाहिला तर साऊथ आफ्रिकेच्या हूज टायफील्डने ओळीने १३७ डॉट बॉल टाकले, तेव्हा ८ चेंडूची एक षटक होते तर भारताच्या मध्यप्रदेशमधील मनीष मजेठिया याने १९९९-२००० मध्ये रेल्वेविरुद्ध खेळताना १३६ डॉट बॉल टाकले होते.

बापू नाडकर्णी यांनी ४१ कसोटी सामन्यांमध्ये १,४१४ धावा केल्या त्यामध्ये त्यांचे १ शतक आणि ७ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १२२ नाबाद. त्यांनी २९.०७ सरासरीने ८८ विकेट्स घेतल्या. त्यांनि ४३ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे ४ वेळा एक डावात ५ किंवा ५ पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदा एका सामन्यात १० खेळाडू बाद केले आहेत. बापू नाडकर्णी यांनी १९१ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८,८८० धाव केल्या असून त्यामध्ये त्यांची १४ शतके आणि ४६ अर्धशतके आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आहे नाबाद २८३. तर यांनी २१.३७ या सरासरीने ५०० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी १९ वेळा एका डावात ५ किंवा ५ पेक्षा जात विकेट्स घेतल्या आहेत. तर त्यांनी एका डावामध्ये फक्त १७ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या आहेत.

बापू नाडकर्णी यांनी मद्रास येथे १९६४-६५ मध्ये ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये ३१ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ९१ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. परंतु त्यावेळी बिशनसिग बेदी या लेफ्ट आर्म स्पिनरचा उदय होत होता. त्यामुळे बापू नाडकर्णी यांनी संधी अभावानेच मिळत होती. त्यामुळे १९६७ च्या इंग्लंडच्या टूर मध्ये त्यांचा समावेश झाला नाही परंतु त्याच वर्षी न्यूझीलंडच्या टूरवर असताना त्यांनी विलिग्टन येथे झालेल्या सामन्यांमध्ये ४३ धावांमध्ये ६ विकेट्स घेतल्या. तो सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर बापू नाडकर्णी यांनी आपली निवृत्ती जाहीर केली. बापू नाडकर्णी यांच्याशी बोलताना अनेक गोष्टींचा उल्लेख होतअसं असे कधीकधी खूप महत्वाच्या गोष्टी ज्या त्यांच्या काळात घडल्या होत्या त्या त्यांच्यामुळे समजत होत्या. त्यांच्या हाताच्या बोटांकडे लक्ष जाताच जाणवायचे, चेंडू स्पिन तरुण करून त्यांची बोटे अक्षरशः वाकडी झालेली होती. ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ ‘इकॉनॉमी बॉलर’ म्हणून ठरलेले होते. मी लेजेंन्ट्स क्लबचा मेंबर असल्यामुळे अनेकवेळा त्यांना भेटता येत होते.

बापू नाडकरांनी यांचे १७ जानेवारी २०२० मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..