राजकारणाचं वास्तव !

वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात. हे सर्व फक्त सत्तेसाठी चालू असत. जेव्हा एक पक्ष सत्तेवर येतो तेव्हा बऱ्याचदा मागील सरकारचा वारसा पुढे नेत असतो. म्हणूनच तर म्हणलं जात ना ‘ काँग्रेस म्हणजे बीजेपी वजा (-) गाय, आणि बीजेपी म्हणजे काँग्रेस अधिक (+) गाय.’ बारीक विचार केला तर सर्वांच्या लक्षात येईल गाय वगळता दोन्ही पक्ष सारखेच..!
विरोधात, पराभूत सर्व पक्ष एकत्र येतात आणि त्यांनी त्यांची भूमिका निश्चित केलेली असते, जनतेची किंवा सामान्य माणसांची नाही..! त्यांना सरकारच्या विरोधात रचनात्मक टीका द्यावी लागते आणि त्यांना स्वतःचा स्वार्थ साधावयाचा असतो. बाकी समाजासाठी जे ते पांडित्य दाखवतात, ते ऋषि- मुनींच्या कमंडलूतील अमृता सारखेच. कुणावर चार थेंब शिंपडले किंवा नाही काही फरक पडत नाही.प्रत्येक राजकारण्यांच असचं असतं. आपल्याच चार लोकांच्या मुखातून ‘अच्छे दिन’ वदवून घ्यायचे, आणि सकळ समाज-जनं रामराज्यात वावरत आहेत असा भास निर्माण करायचा. विरोधकांच्या रचनात्मक टीकेची संकल्पना बऱ्याचदा द्वेषामध्ये वळते आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विघातक शक्ती वास करू लागतात. विविध राजकीय क्रियाकलापांद्वारे हे डाव सावधपणे साधले जातात. जशी भिंतीवरची पाल आपलं सावज अलगद टिपते. देशातील जाती-जातीमध्ये, धर्म-धर्मामध्ये तेड निर्माण करून एकमेकांबद्दलचा अतूट विश्वास हहळूहळू कमी होऊ लागतो. बाकी आपली समाज माध्यमे आहेतच आगीत तेल घालायला.

लोकशाहीमध्ये सजग नागरिकांची भूमिका खूप महत्वाची असते तरीही ते सर्वात भ्रमित आणि अज्ञात असतात. प्रत्येक नेत्याकडे प्रथम मानव म्हणून पाहिले पाहिजे, ‘दैवत’ नाही..! आणि त्यांच्या निर्णयामध्ये चुका अपरिहार्य आहेत.आपला त्यांच्याप्रती अंध विश्वासामुळे अंधश्रद्धेची प्रवृत्ती समाजमध्ये पाय रोवून उभी राहते. राजकारणाचे स्वरूप न समजता, त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम न जाणून घेता विश्वास ठेवणे म्हणजे आपण स्वतःच आपला भविष्य काळ कापून काढण्यासारखं आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

भगतसिंग यांचं एक वाक्य आहे ” जे राजकारण आम्हा तरुणांचं भविष्य कसं असावं हे ठरवतं, ते राजकारण कसं असावं हे ठरवण्याचा आम्हा तरुणांना पूर्ण अधिकार आहे.” म्हणून तरुणांना राजकारणाच्या सर्व परंपरागत बेड्या तोडाव्या लागतील. आणि या विधवंसक वादळाची दिशा बदलावी लागेल. पण आपला माथा ताळ्यावर ठेऊन. म्हणजेच कुणाच्याच ताटाखालच मांजर न होता..! बरीच तरुण तरुणी समाज माध्यमावर आपापल्या नेत्याची वक्तव्य प्रमाण ग्रंथ मानून, सगळीकडे पसरविण्यात आपला बहुमोल वेळ वाया घालतात. प्रश्न हा आहे की त्यातून आपल्याला काय मिळतं? उलट आपल्याच बौध्दिक गुलामगिरचं दर्शन होत. अनभिज्ञ लोकांना भीती वाटली नाही आणि समाज विभाजित झाला कारण लोकांना जे ऐकू येत होते ते नेत्यांच्या भाषणात दिले गेले. त्यास वितरीत करण्यासाठी एका नेत्याकडे दृष्टिकोन आणि कर्मकारणभाव असावा लागतो. धर्मनिरपेक्ष देशांमध्ये कर्मदृष्टी मंदिर, मशिदी, चर्च किंवा इतर धार्मिक गोष्टींशी संबंधित नसावी. धार्मिक द्वेष आणि आर्थिक वाढीचा संबंध आसतो हे आपल्या बुध्दीत ठासून भरलं पाहिजे.
काही नैतिक आचार संहिता किंवा भाषा संवैधानिक प्रतिष्ठित लोकांसाठी कार्य करण्यासाठी निर्माण केली पाहिजे, फक्त ऐटीत मिरवण्यासाठी नाही. स्वातंत्र्याच शहाणपण चांगले आहे, निपक्ष शहाणपण दुर्मिळ आहे..!

तथापि, राजकारणी म्हणून त्यांची भूमिका निश्चितच आहे. त्यांना टीकाही करावी लागेल आणि सरकारमध्ये एखादी चूक सुधारून प्रगतीही करावी लागेल. राजकारणात भाग घेण्याकरिता प्रथम राजकारणाविषयी समजून घ्यावे.
जर आपण अनुयायांबद्दल बोललो तर त्यांच्यापैकी बहुतेक जण अशा नेत्यावर विश्वास ठेवतात जे लोक ऐकू इच्छित असलेल्या समस्यांविषयी बोलतात आणि स्पर्श करतात. परंतु, माझ्या पश्चात्तापाने,(मत देण्याच्या) त्यांच्यापैकी काही राजकीय हत्यार बनतात, जे नेते आणि राजकीय पक्षाच्या कठोर चाहत्यांना विरोध करतात आणि विरोधविरोधी आक्रमक विचार समाजामध्ये फोफावू लागतात. मला अशा मानसिक प्रवृत्तीत वाढ दिसून येते. सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याची टीका करणे ही लोकशाहीची प्रमुख वैशिष्ट्ये आहे.

मला सर्व राजकीय नेत्यांसाठी लोकांमध्ये तीव्र अंधश्रद्धा दिसते, जे देशासाठी निरोगी असू शकत नाही. पक्षाच्या कठोर समर्थकांना मारहाण करा, कोणत्याही टीका सहन न करण्याचा हेतू नसून फक्त इतरांना त्यांच्या आवडत्या नेत्यांनी केलेले चांगले कार्य ऐकण्याची इच्छा आहे.

लोकांना मते आहेत, ते मान्य करा. शेवटी लोकशाही आहे, परंतु टीकाकार्यात हिंसाचाराला बढावा देणारी आणि देशामध्ये विभाजनाचा विस्तार करणारी वक्तव्य देशाचा समूळ नाश करत असते, हे जगातील इतर घटनांवरून शिकलं पाहिजे. विरोधी पक्ष आणि निर्णय दोन्ही नैतिकदृष्ट्या ह्या विश्यापासून दूर राहिले पाहिजेत.

बऱ्याच काळापासून, आम्ही तेच लोक आहोत जे मतभेदांना विभाजित आणि लुटण्यासाठी तयार केलेल्या भ्रमक गोष्टींवर भरवसा ठेवत आहोत..!

©आज

Avatar
About अनिलराव जगन्नाथ 10 Articles
उत्कृष्ट वक्ता, लेखक, ब्लॉगर, राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचा अभ्यासक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..