हर घडी मिळो सहवास

मानव देह देवूनी ईश्वरा,
उपकार केले मजवरती
सेवा करण्या तव चरणाची,
संधी लाभली भाग्याने ती…१,

कर्म दिले तू मानव योनीसी,
श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
उद्धरून हे जीवन नेण्या,
कामी येतील प्रयत्न सगळे…२,

मुक्त होणे जन्म मरणातूनी,
साध्य होई ते प्रभूसेवेने
परि तीच मुक्ती वंचित करते,
आनंदमयी प्रभू दर्शने…३,

एक मागणे प्रभू चरणी,
मुक्ती न देयी तू मजला
संधी देवूनी तव सेवेची,
सहवास मिळवा हर घडीला…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1595 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…