नवीन लेखन...

रेडिओ सखा

on radio day

वर्षाचे कुठले ना कुठले दिवस महत्वाचे मानले आहेत . एखादा दिवस वसुंधरा दिन तर एखादा कर्करोग दिन ह्या निमित्ताने त्या त्या विषयाचे गाम्भीर्य कळावे महत्व कळावे म्हणून जनजागृती होत असते.

१३ फेब्रुवारी हा असाच दिवस जो युनेस्कोने महत्वाचा असा जाहीर केला आहे व तो दिवस रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे. मोबाईलच्या टीव्ही च्या जमान्यात रेडिओला तसे महत्व कमी कमी होत गेले असले तरी एकेकाळी हाच आपला सखा होता. मनोरंजनापासून माहिती देण्यापर्यंत सर्व कामासाठी ह्या सख्यावर अवलंबुन राहायचे. माझे एक दिवणगत परिचित बिचार्यांना निद्रानाशाचा विकार होता ते सांगतात रेडिओ मुळे सर्वजण डाराडूर झोपलेले असताना मी रात्र काढू शकत होतो ती फक्त रेडिओमुळेच .

आज अनेकजणांना त्याच्या आठवणी असणारे अजूनही काही दुर्गम भागात रेडिओ शिवाय आणखी मनोरंजनाचे माध्यम नाही. शिवाय श्रीभागात देखील आवर्जून रेडिओ ऐकणारे आहेत.

अर्थात १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून जरासा उशिराच जाहीर झाला. नेमके साल सांगायचे तर २०११ मध्ये युनेस्कोने हि घोषणा केली व २०१२ पासून त्याचा अंमल झाला .

२०१० मध्ये स्पेनिश रेडिओ अकादमीने प्रथमच हा दिवस रेडिओ दिवस म्हणून जाहीर व्हावा ह्यासाठी आग्रह धरला होता.१३ तारखेलाच १९४६ साली संयुक्त राष्ट्र रेडिओ सुरु झाला होता म्हणून हा दिवस पुढे आला .

प्रत्येक दिवस हा काहींना काही संदेश घेऊन येत असतो. २०२२ ची थीम होती इव्होल्यूशन द वर्ल्ड इज ऑल्वेज चेंजिंग म्हणजेच विकासाबरोबर जगाचाही विकास होत आहे.

ह्या निमित्ताने रेडिओ सम्बन्धी सिंहावलोकन करणे गैर ठरू नये.

जरी रेडिओ जगात ऐकू येत आला तरी भारतात त्याची सुरवात १९२७ साली झाली पण त्याही अगोदर टपाल खाते व मुंबईच्या एका प्रख्यात वृत्तपत्राच्या विद्यमाने ऑगस्ट १९२१ मध्ये गप्पांचा एक कार्यक्रम प्रसारित झाला होता अशी माहिती आहे.

माध्यमामध्ये अनेक स्थित्यन्तरे झाली टीव्ही आले अनेक वाहिन्या आल्या पण रेडिओचे आकर्षण म्हणा कि महत्व तसूभरही कमी झाले नाही ह्याचे एक कारण म्हणजे कोठल्याही ठिकाणी सहजपणे तुम्ही त्याला नेऊ शकता . त्याला पाऊस थंडी गरमी असला मोसम लागत नाही व विशेष म्हणजे विजेवरही तो अवलंबुन असत नाही म्हणून तर अनेकांचा तो पसन्त सखा आहे .

रेडिओतील कार्यक्रम वेळोवेळी बदलत आहेत पण त्यात अनेकांना जाणवते ती भाषा. जात जात हेही सांगायला हवे कि आजच्या सुपरस्टार महानायक बिग बी म्हणून ज्याला आम्ही ओळखतो जो कॅल्कुत्तातील नोकरी सोडून मुंबईला आला त्या अमिताभ बच्चन ला ह्याच रेडिओने निवेदकाच्या जागेसाठी नापास केले होते.

असो आता निवेदकाची जागा बडबड्या आर जे ने घेतली आहे. शांत धीर गम्भीर आवाज कधीच मागे पडला असून त्या जागी चटपटी इंग्रजी भाषा , विनोद खेळकर शैलीत फिल्मी गोष्टी तुम्हाला रमविणारा आर जे आला आहे , अर्थात ह्यात सरकारी व खाजगी असे दोन प्रकार दृष्टीला पडतात . खाजगी वाहिनी तर वाढतच आहे.

आजमितीला गोव्यात रेडिओ एफ एम रेनबो हा सरकारी धरून आणखी तीन खाजगी वाहिन्या आहेत. ह्या शिवाय सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसा प्रमाणे स्वतःचे कम्युनिटी रेडिओ हि आहेत ..

जगभरात ह्याची संख्या २५१ तरी भरेल भारतात मात्र हि संख्या २२ भरेल असे वाटते . खरेतर हि संख्या वाढावी म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत ,. असो रेडिओची गरज व महत्व आजच्या युवा पिढीला आपण सांगितले पाहिजे . संवादासाठी एक उत्तम साधन शिवाय ह्या माध्यमातून माहिती जनसम्पर्क उत्तमरीत्या करता येतो.ह्या माध्यमातून कल्पकतेने अनेक गोष्टी श्रोत्या पर्यंत पोचवता येतात .

आज घडीला कित्येक समस्या आहेत . सगळ्याच काही राजकारणामुळे निर्माण झालेल्या आहेत असे नाही. उदा कचरा वाहतूक समस्या हि आपणच तयार केलेली आहे. ह्या संदर्भात आपण जर सातत्याने सूचना केल्या तर तो संदेश थेट घर घरानी जाऊ शकतो.

खाजगी वाहिनीवर रहदारी वाढ्लेल्याची माहिती सांगितली जाते पण सरकारी वाहिन्यांत तसा प्रयत्न का बरे होत नाही? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. इथे ना राजकारण येते ना सरकार विरोध दिसतो. रहदारी मुळे ज्यांची कुंचबणा होऊ शकते त्यांना हि माहिती फायद्याची ठरू शकते. दूसरा दूरच मार्ग ते घेऊ शकतात .

रेडिओ ऐकण्याचा खास कार्यक्रम शाळांमधून एक दिवस ठरवून करता येतो. ह्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल.अर्थात ह्यासाठी तुम्हाला ऑफिस सोडून त्या शाळेत यावे लागेल. आता माध्यमाच्या शोधामुळे रेकॉर्डींग करून रेडिओवर ऐकवू जाऊ शकते.

असो. आपापल्या परीने रेडिओ अच्छे दिन आणू शकतो. हे खरे.

— प्रा रामदास केळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..