नवीन लेखन...

पुनर्नवा

पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.

ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.

पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.

चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

१)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.

२)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.

३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.

४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.

५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..