नवीन लेखन...

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग २

प्रतिभा- व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग २                                                                      

व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते.

स्थिर (still life) आणि असामान्य (Unusual) चित्रे.

चित्रकलेतील व्हॅन गॉगचा प्रवास हा फक्त १० वर्षांचा. या दहा वर्षात त्याने, नुनेन, अँटरेप, पॅरिस, आर्लेस, सेंट रेमी, ऑव्हर्स- सूर- ओइसे, अशा निरनिराळ्या ठिकाणी आपली चित्रे रंगविली. या काळात स्केट गेम , निसर्ग चित्रे, पोर्ट्रेट्स, स्थिर चित्रे, लुथोग्राफी, अशा प्रकारच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य कामकरी माणसाला त्याने केंद्रस्थान दिले आहे.

त्याच्याबरोबर त्याचे चित्र म्हणजे, “ए पेअर ऑफ शूज’ , (म्हणजे बुटांचा जोड). हे एक  अत्यंत वास्तववादी, आणि  अभिव्यक्तीचे प्रतीक असे चित्र आहे. व्हॅन गॉगने या फाटलेल्या जुन्या शूजमध्ये सखोल अर्थ पाहिला. व्हॅन गॉग याने आपल्या जीवनात चोखाळलेल्या अत्यंत क्लेशकारक आणि खडतर मार्गाचे दर्शन यातून घडविलेले आहे. त्याचबरोबर अतिशय श्रम करणाऱ्या कष्टकरी सामान्य मजुरांचे,  वापरून वापरून ‘झिजून गेलेले बूट’ हे जणूकाही त्यांच्या जीवनाचे एका रूपक स्वरूपात प्रतिनिधित्वच करतात.  कामगारांच्या ‘दुःसाध्य  जीवनाचे तंतोतंत दर्शन आपल्याला घडते.

मला आवडलेल्या स्थिर चित्रांपैकी (Still life with Bible) हे सर्वोत्तम असे स्थिरचित्र आहे.

ऑक्टोबर १८८५ मध्ये व्हॅन गॉगने  टेबलवर ठेवलेल्या उघड्या बायबलचे अत्यंत लक्षवेधी, मनोवेधक आणि स्पष्टतेचे प्रतीक असलेले चित्र रेखाटले आहे . हे त्यांच्या वडिलांचे Bible होते.  आणि त्याच्या बाजूलाच, फ्रेंच लेखक ‘एमिल झोला’ याने लिहिलेले ‘La Joie de Vivre’ (जीवनातील आनंद) हे पुस्तक  ठेवले आहे.

हे पुस्तक आधुनिक बायबल आहे असे त्याला वाटत असे. म्हणजेच ‘बाप आणि मुलाचे’ भिन्न दृष्टिकोन  त्याने या चित्रात दर्शविले आहेत.

व्हॅन गॉघची ‘सेल्फ पोर्ट्रेट्स’

स्वतःचा उदरनिर्वाह करू शकेल एवढा पैसा त्याच्याजवळ नव्हता मग मॉडेल ला द्यायचा पैसा कुठून येणार अशा वेळी त्यांनी सेल्फ पोर्ट्रेट काढण्यास सुरुवात केली,     .आज तर जगप्रसिद्ध आहेत. त्यातील पुष्कळशी चित्रे उजव्या बाजूच्या चेहऱ्याची आहे कारण त्याने डाव्या कानाची पाळी कापून घेतल्या नंतर बरेच  महिने फडक्याने झाकून घेतला होता. नवीन चित्र काढण्यासाठी कॅनव्हास करता  अनेक वेळा त्याच्याजवळ पैसे नसल्यामुळे पहिल्याच चित्रावर तो दुसरी चित्र काढत असे . येथे असतांना ‘सीएन  हुरनिक’ या त्याच्या आईच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेल्या मिस्ट्रेस ची सुद्धा त्याने पोर्ट्रेट्स काढली आहेत. तिला आपले एक एक मॉडेल म्हणून तिची  निवड केली होती.

त्याने  ३५ पेक्षा अधिक ‘सेल्फ पोर्ट्रेटस”  काढली आहेत. १८८६ ते १८८८ या काळात त्याने आपल्या पॅरिस मधील वास्तव्यात २५ पोर्ट्रेटस काढली आहेत.  अनेक चित्रांमध्ये त्यांनी ‘स्ट्रॉ हॅट’  घातलेली आढळते, तर काही चित्रात,  चित्रकाराचा सैल अंगरखा किंवा सूट दिसून येतो.  स्वतःची चित्रे काढत असताना तो आपल्या चेहऱ्यावर आपल्या मनातले भाव कसे व्यक्त झालेले दिसतील याला प्राधान्य देत असे.  मरणापूर्वी दोन वर्षे आधी, १८८८ मध्ये, त्याने काढलेल्या चित्रात त्याच्या मनस्थितीचे उत्तम दर्शन घडते.

पोर्ट्रेटस च्या माध्यमातून स्वतः:च्या मनस्थितीची आणि भाव विश्वाची ओळख करून घेण्याचा ध्यास (Obsession) त्याने घेतला होता.   ‘पिंक ग्रे’ अशी चेहरेपट्टी,  हिरवे डोळे आणि ग्रे केस,  चेहऱ्यावर व कपाळावर सुरकुत्या आणि लाल दाढी ! जीवावर उदार झालेल्या दुखी मनुष्याचे चित्रीकरण त्यात झाले आहे. मृत्यूची सावलीच जणू त्याला दिसत होती. १८९० मध्ये आत्महत्येचा आधी काढलेले हे अखेरचे ‘सेल्फ पोर्टेट”


स्टारी नाईट

‘पोस्ट-इम्प्रेशनिस्ट’ चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचे ” स्टारी नाईट’ हे ऑईल-ऑन-कॅनव्हास पेंटिंग आहे. जून १८८९ मध्ये पेंट केलेले चित्र ! त्यात सूर्योदय होण्याआधीच ‘सेंट-रेमी-डी-प्रोव्हन्स’ येथील त्याच्या ‘असाइलम’ च्या (आश्रय खोलीच्या) पूर्वाभिमुख खिडकीतून हे दृश्य चित्रित केले आहे, ज्यामध्ये एक काल्पनिक गाव वसलेले आहे.

‘पोस्ट-इम्प्रेशनिस्ट’ चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचे ” स्टारी नाईट’ हे ऑईल-ऑन-कॅनव्हास पेंटिंग आहे. जून १८८९ मध्ये पेंट केलेले चित्र !  त्यात सूर्योदय होण्याआधीच ‘सेंट-रेमी-डी-प्रोव्हन्स’  येथील त्याच्या ‘असाइलम’ च्या  (आश्रय खोलीच्या) पूर्वाभिमुख खिडकीतून हे दृश्य चित्रित केले आहे, ज्यामध्ये एक काल्पनिक गाव वसलेले आहे.

२३  डिसेंबर १८८८ च्या “मानसिक ब्रेकडाउन’ (जेंव्हा त्याने स्वतःच्या डाव्या कानाचे  ‘आत्म-विच्छेदन’ केले होते) आणि त्यानंतर  व्हॅन गॉगने ८  मे १८८९  रोजी स्वेच्छेने स्वतःला ‘सेंट-पॉल-असाइलम’ ( वाच्यार्थाने, ‘वेड्यांचे आश्रय स्थान’ ) मध्ये दाखल करून घेतले.  ‘तारांकित रात्र”  हे अत्यंय प्रसिद्ध  असलेले आणि वाखाणले गेलेले तैलचित्र आहे.  त्यात दिसणारा,  चित्रातील, सर्वात तेजस्वी “तारा”, हा, ‘सिप्रेस्स’ झाडाच्या उजवीकडे, झळकणारा “शुक्र- तारा’ आहे. हे ‘सिप्रेस्स’ चे झाड, मृत्यूचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. २९ जुलै, १८९० मध्ये त्याने केलेल्या आत्महत्येचे ते संकेत असल्याचे ‘मनोवैज्ञानिक’ म्हणतात. कलाकाराच्या अशांत, ‘स्वप्नवत मनस्थितीची’ अभिव्यक्ती या चित्रात त्याने साकारली असल्याचे’ विश्लेषण केले गेले आहे. काही विश्लेषकांनी ‘शुक्र तारा’ आणि ‘उंच वाढणारे ‘सिप्रस’ तरू ‘यांच्या संघर्षाचे, त्याच्या अशांत अशा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘व्हॅन  गॉग’ करीत असलेल्या प्रयत्नाचे दृश्यचित्र असल्याचे निदान केले आहे.

सूर्यफुले – व्हॅन गॉगच्या सूर्यफुलांच्या कलाकृती जगप्रसिद्ध तसेच सर्वात महागड्या कलाकृती म्हणून ओळखल्या जातात .सगळ्या फुलातून त्यांनी सूर्य फुलांची मुद्दामूनच निवड केली होती. निरनिराळ्या  छटा  त्याला पडताळून पाहायचा होत्या. त्याने, पॅरिसमध्ये असताना पहिले सुर्यफुलाचे चित्र रेखाटले होते . पॉल गोगीनने चित्र पाहिल्यावर अत्यंत प्रभावी झाला होता .म्हणून यलो हाऊस मध्ये कलाकारांच्या वसाहतीत पॉल गोगीनने बेडरूम मध्ये त्यांनी त्याचे स्वागत करण्यासाठी    येण्यापूर्वीच सूर्य फुलांची मालिका काढून त्यातील काही चित्रे भिंतीवर मुद्दाम लावली होती. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सूर्य फुलांचा वापर केला होता.


व्हॅन गॉगचे पत्रलेखन

व्हॅन गॉगने लिहिलेली पत्रे ही त्याच्या ‘विश्वाची’ खिडकी आहेत

व्हिन्सेंट  व्हॅन  गॉग हा एक अतिशय ‘उत्कट’ असा पत्र लेखक होता. त्याच्या पत्रांपैकी एक तृतीयांश पत्रे फ्रेंच भाषेत लिहिलेली आहेत. ती पत्रे विशेष आहेत ती त्यावर रेखाटलेल्या ‘रेखा चित्रांमुळे’. त्याची पत्रे त्याचा जागतिक साहित्यिक दर्जाची शैली प्रतिबिंबित करतात . सहाशे पेक्षा अधिक पत्रे, आपला भाऊ, ‘थिओ’ ला तर, काही पत्रे  बहीण ‘विल’ हिला आणि नातेवाईकांना, तर उर्वरित पत्रे ‘एमिले बर्नाड’  सारख्या कलाकाराना लिहिलेली आहेत. ‘थिओ’ने व्हॅन गॉग वर अतिशय तीव्र अशी माया केली. आपल्या मनातील कल्पना आणि भावना ‘शेअर करण्याची तीव्र गरज व्हॅन  गॉगला भासत होती आणि ती उणीव ‘थिओने’ भरून काढली. मनातल्या सर्व भावना त्याच्याजवळ तो  पत्रातून सांगत असे .पत्र म्हणजे व्हॅन गॉगच्या अव्यक्त मनाचा आणि आयुष्याचा आरसा बनला. त्याच्या जीवनात ‘पत्र  आणि चित्र’ या गोष्टींना फार महत्त्व होतं. एका कलाकाराच्या जीवनाचा कालक्रम म्हणून ही पत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ॲम्स्टरडॅम संग्रहालयात, त्याच्या पत्रांचा सर्वात मोठा संग्रह आहे. ही पत्रे त्याच्या जीवनातील घडामोडींवर प्रकाश टाकणारा सर्वात महत्वाचा असा दस्ताऐवज समजला जातो.

औदासीन्य आणि नैराश्याच्या खाईत सापडला असताना त्याने थिओला लिहिलेल्या एका पात्रात व्हॅन गॉग लिहितो,” मला स्वतःचा  खूपच  राग आला आहे,  कारण मला जे करायला हवे ते मी करू शकत नाही आणि अशा क्षणी मला असा आभास होत आहे की मी जणू कोणी खोल गडद अशा विहिरीच्या तळाशी हात -पाय बांधून  ठेवलेल्या अवस्थेत पडलो आहे आणि मी पूर्णपणे असहाय्य आहे”. या धडपडीचा अविष्कार व्हॅन गॉग यांच्या उद्गारांमध्ये व्यक्त झालेला आढळतो. अशा प्रकारच्या यातनांतून बाहेर पडण्यासाठी केलेली किती तरी उदाहरणे त्याने ‘थिओ;ला लिहिलेल्या पत्रांमध्ये (QUOTES-उद्धरणे) आढळतात.

1“माझ्या स्वप्नांमध्ये  ही पैंटिंग्स येतात आणि आणि या पेंटिंग्स मध्ये या स्वप्नांना मी रंगवतो”.

2“मला नेहमीच असे वाटते की दिवसापेक्षा रात्र अधिक जिवंत आणि अधिक रंगीत असते”.

3″वादळातही शांतता असते”

4″जेव्हा मी पडतो तेव्हाच मी पुन्हा उठतो”

5“कला दीर्घ आहे आणि आयुष्य लहान आहे”

मरणापूर्वी ‘थिओ’ जवळ त्याने काढलेले उद्गार- “केवळ दुःख शाश्वत आहे”.

शेवटी मानसिक आजाराशी जीवघेणा संघर्ष, करताना व्हॅन गॉगने, उदात्त आनंद आणि कलेमध्ये त्याला मिळालेल्या अपार परिपूर्णतेबद्दल सातत्याने आणि वारंवार लिहिले – अश्या हेतूंमुळेच आणि सर्जनशीलतेमुळेच   त्याने ‘दुःसहाय्य छोट्याशा आयुष्यावर ‘नि:संशयपणे’  तो मात करू शकला


रमणीय निसर्ग चित्रांचे रेखाटन

1८८२ ते १८९० या काळात  त्याने अनेक निसर्ग चित्रे काढली परंतु निसर्ग चित्रे काढण्याचा मुख्य काळ  हा १८८५ ते १८८८ हा होय. पाच खंडांमध्ये आज ती एकत्रित केली आहेत. ही चित्रे जणू काही उत्कृष्ट अश्या कॅमेरानी काढलेली आणि निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघाली आहेत असे वाटण्या एवढी हुबेहूब, आकर्षक आणि मोहक आहेत. पर्वतांच्या रांगा, दऱ्या , फळे, फुले, पाने, गव्हाची शेते, फार्म हाऊस, जंगले, समुद्र किनारे असे नानाविध विषय निसर्ग  चित्रांचे होते. पण जवळून आणि समीक्षकांच्या दृष्टीने पाहणाऱ्याला त्यात मानवीय दृष्टिकोन लक्षात येतो आणि मनाला भिडतात.

प्रत्यक्षात ‘वेड्यांच्या आश्रमात तो राहत होता आणि या ‘असाइलम’ च्या आजूबाजूला पसरलेल्या विस्तीर्ण मानवाच्या परिश्रमांतून निर्माण झालेल्या बागांमळे त्याला निसर्ग चित्रे रेखाटण्याची प्रेरणा मिळाली.

व्हॅन गॉगने त्यांवर काम करणारे शेतकरी, कामकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या जगण्याचे खरे आणि सत्य स्वरूप पहिले होते, त्यामुळे ती श्रमिकांच्या जगण्याची , जीवनाची चित्रे आहेत. या ‘असाइलम’ मधून, खिडकीतून दिसणाऱ्या  निसर्गाची ती १२ चित्रे आहेत. पिकविलेल्या गव्हाचे शेत त्याला सूर्य उगवताना दिसत असे. सूर्य आकाशात पुढे पुढे सरकताना ,परिदृश्यातील बदलणारे रंग जीवनातील बदलणाऱ्या रंगांसारखे त्याला वाटत !

त्यात जीवनाचे रूपक म्हणून, गहू आणि शेती यांचे जीवनचक्र – पीक येते, वाढते, लावणी, कापणी, होते आणि ती मानवाचे जीवन टिकविते. व्हॅन गॉगने हे सर्व टप्पे रंगविले आहेत ते, ‘Cycles of Life with Harvesting’ या  फक्त आठवडाभरात निर्माण केलेल्या मालिकेत, १० पेंटिंग्स आणि ५ ड्रॉइंग्स यांचा समावेश आहे.


कथा  सूर्य फुलांच्या निसर्ग चित्रांची आणि एरियस मधील ‘यलो  हाऊसची “

व्हॅन गॉगचे एक स्वप्न होतं. अनेक ‘सम विचारांच्या’ चित्रकारांची, सह कलाकारांची,  कलावंतांची एक वसाहत’ फ्रान्समध्ये असावी, जिथे सर्व चित्रकार एकाच छताखाली राहतील आणि सर्वांचा मिळून एकच स्टुडिओ  असेल. त्याकरता त्यांनी ‘एअरलेस’ मध्ये भाडे तत्वावर एका ‘मॅन्शन’ मध्ये १ मे १८८८ रोजी चार खोल्या घेऊन त्याचे YELLOW HOUSE असे नामकरण केले होते . जपानी  संस्कृतीत पिवळा रंग मैत्रीचे प्रतीक समजला जातो. म्हणून त्याने भिंतींना सुद्धा बाहेरून पिवळा रंग दिला होता .महागडे नव्हेत परंतु खुर्च्या, टेबले यांचा रंगीत असा खराखुरा स्टुडिओ, अर्थात आवश्यक वस्तूंचा संग्रह असं त्याचं स्वरूप होतं.

व्हॅन गॉग च्या चित्र कलाकृतींमद्ये ‘सूर्यफुलांच्या कलाकृती’ जगप्रसिद्ध,  तसेच सर्वात महागड्या कलाकृती म्हणून ओळखल्या जातात .सर्व फुलातून त्याने ‘सूर्य फुलांचीच’  मुद्दामूनच निवड केली होती. त्याचा सूर्यासारखा गडद, प्रकाशमान रंग, मनाला उल्हसित करणाऱ्या आणि भुरळ घालणाऱ्या, एकाच पिवळ्या रंगाच्या त्याच्या विविध छटा, त्याला आपल्या निसर्ग चित्रामध्ये चितारायच्या होत्या. एअरलेस, दक्षिण फ्रान्स मध्ये १८८८-८९ या काळात ही तैलचित्रे त्याने रंगविली. ‘उभ्या फुलपात्रांमद्ये’, ‘पाच कॅनव्हास’ वर या थक्क करणाऱ्या कलाकृती रेखाटल्या होत्या. या फुलांमध्ये व्हॅन गॉगने आपल्या अत्यंत उल्हसित मनस्थितीची दर्शन घडविले आहे. स्वतः:ला विसरून त्याने या चित्रांमध्ये झोकून दिले आहे आणि म्हणूनच त्याची चित्र सर्वांनाच भावतात. ‘यलो हाऊस’ मध्ये उतरलेला आपला मित्र- पॉल गौगीन- याच्या स्वागतार्थ, ही ‘सूर्य फुलांची मालिका त्याने केली. त्याच्याबद्दल आपली कृतज्ञता त्याला व्यक्त करावयाची होती आणि  म्हणूनच त्यातली दोन चित्रे त्याने या यलो हाऊस मधील त्याच्या रूममध्ये त्याच्या नजरेस पडतील अशा रीतीने टांगून ठेवली होती. पॉल गोगियानचे आगमन झाल्यानंतर व्हॅन गॉग अतिशय उद्दीपित मानसिक अवस्थेत होता.

पण येथूनच एका दुर्दैवी कहाणीचा जन्म झाला. व्हॅन गॉग हा विनम्र, सर्वांचे ऐकणारा , सर्वां बद्दल आदर बाळगणारा आणि त्यांचा सन्मान ठेवणारा असा होता. त्याच्या विरुद्ध पॉल गोगियान, अतिषाशी हेकेखोर, स्व-केंद्रित, आणि लोकांच्या भावनांची कदर न करणारा असा होता.  पॉल पॉल गोगीनचे आगमन झाल्यानंतर व्हॅन गॉग अतिशय उल्हसित झाला होता.

काही दिवसांनी व्हॅन गॉगने आपल्या ‘आर्टिस्ट कॉलनीची’ कल्पना पॉल गोगीनसमोर मांडली. इतर चित्र-कलाकारांना या कॉलनीत सहभागी करून घेण्याची योजना मांडली. दुर्भाग्य असे की पॉल गोगीनने याला स्पष्ट नकार दिला आणि तेथून निघून जाण्याचा आपला निर्णय सांगितलं. हा व्हॅन गॉगला मोठाच, सहन न करता येणारा असा  धक्का होता. व्हॅनगॉगच्या इतका प्रचंड हिरमोड झाला की दुःखाने तो मनात कोसळला, औदासिन्याच्या व्हॅन गॉगल मोठा धक्का बसला. पॉल गोगीनशी त्याचे जोरदार भांडण झाले आणि पॉल सर्व ‘पॅक’ करून तो जायला निघाला. ‘आर्टिस्ट कॉलनी’ च्या व्हॅनगॉगच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. औदासिन्याच्या भरात, तिरीमिरीत त्याने आपल्या डाव्या कानाची ‘पाळी’ कापून घेतली. आपल्या मैत्रीचा हा असा अंत त्याला सहन झाला नाही.


व्हॅन गॉगचा मृत्यू आणि त्याचा प्रेरणादायक वारसा

त्याच्या प्रवासातील  अखेरचे २ आठवडे. तो अतिशय अस्वस्थ व निराश झाला होता. आपला भाऊ ‘थिओ’ वर आपल्या जगण्याचा सर्व भर टाकला आहे या विचाराने तो बेचैन होता. झाडांची मुळे, वरती आलेल्या वेड्या वाकड्या फांद्या, या चित्रांमधून माणसाच्या जीवनात येणाऱ्या वादळांचे दर्शन  घडते.

याच अवस्थेत १८९० मध्ये त्याने गव्हाचे शेत आणि त्यावर उडणारे कावळे यांचे ‘निसर्ग चित्र’ काढले, जणू जीवनाच्या अंतिम क्षणांची त्याला चाहूलच लागली होती !

२७ जुलै १८९० मध्ये आयुवेर्स ला एका शेतावर असताना व्हिन्सेंट याने आपल्या छातीवर  बंदुकीच्या गोळ्या घालून आत्महत्या केली असे मानले जाते. त्याचा भाऊ ‘थिओ’ त्याच्या बिछान्या जवळ बसला असताना  दोन दिवसांनंतर, २९ जुलै १८९० ला मृत्यूने त्याला अखेर गाठले.

त्याच्या आत्महत्येची अनेक कारणे सांगितली जातात, ज्यात थिओवर ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाचा समावेश आहे. १८९०च्या मे महिन्यात त्याला ‘असायलं’ मधून डिस्चार्ज दिला गेला आणि पॅरिसच्या उत्तरेकडील ऑव्हरस- सूर या शांत खेड्याकडे रवाना झाला.  परंतु परत जाताना वाटेत तो थिओ- जोहाना आणि त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. भविष्या बद्दलची अनिश्चितता आणि कलाकार म्हणून आपण अपयशी ठरल्याची त्याला खंत वाटत होती.परंतु कारण काहीही असले तरी त्याच्या मानसिक स्वास्थ्यात झालेला बिघाड त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला. त्या वेळी त्याचे वय होते अवघे ३७ वर्षे !

त्याच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते.

जन्मापासूनच घेऊन आलेल्या मानसिक आजाराशी जीवघेणा संघर्ष, करताना व्हॅन गॉगने, फक्त दहा वर्ष्यांचा कालावधीत मानसिक वैफल्यावर मात करून सृजनशीलतेने एक महान कलादालन निर्माण केले. त्याची तुलना साहित्यिक क्षेत्रात आजरामत्व मिळविलेले रशियन लेखक ‘फायॉदार मिखालोविच दोस्तोयेव्हस्की’ यांच्याशीच करता येईल.

— वासंती गोखले
vasantigokhale@gmail.com

2 Comments on प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग २

  1. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण लेखन. हे वासंतीचे वैशाष्ट आहे.

  2. Both parts are to good.Narration is in very lucid language & very honest! All the best for conceiving such good old days events to write & display before new generation! – Vikram Parelkar

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..