नवीन लेखन...

पोषण ते कुपोषण

पोषण म्हणजे काय? याला संतुलित आहार ज्यामुळे जीवनसत्त्वे, खनिज द्रव्ये आणि प्रथिने यांचे मिळून सलग केलेले आहार असेही म्हणता येईल. आता कुपोषण म्हणजे ज्या पोषणात जीवनसत्त्वे अथवा खनिज द्रव्ये नसतात आणि ज्याला प्रथिने अजिबात नसतात यालाच कुपोषण असे म्हणता येईल. मध्यंतरी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल ब्युट्रीशन याने कुपोषणावर खूपच चर्चा झाली. कारण कुपोषण फक्त गरिबात आढळते, असे नाही पण अति श्रीमंत लोकांनाही कुपोषणाचा त्रास होतो. कारण हे लोक विशेषतः तरुण मुले व मुली रस्त्यावर येऊन वाटेल ते खातात. तसेच हे अन्न कशाप्रकारचे असते याकडेही पाहातही नाहीत. विशेषतः गाडीवरील पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, बटाटे वडे, सामोसे अशी कितीतरी दुकानांवर या गोष्टी फिरावयास जातात व खात असतात. सरतेशेवटी तरुण घरी आल्यावर भूक नाही म्हणून जेवण नाही. याने असंतुलित आहाराने मुलांचे सर्वच आहार बिघडून जातो. मग पुढे लठ्ठपणा, पोट सुटणे वगैरे अनेक यातना या मुलांना होतात व अंगात रक्त नाही म्हणून शेरा मारतात व टॉनिक देतात. जर हे कुपोषण आवरले नाही तर देशाला खूपच हानिकारक असतात.

. कार्बोहायड्रेट: कार्बोहायड्रेट हे प्रमुख अन्न आहेत. ते म्हणजे भात, भाजी, गहू अथवा बाजरी म्हणजे भाकरी आता हे कर्बोदके फार लवकर शरीरात मिसळतात. तसेच साखर व पिष्टमय पदार्थ अत्यंत हळू मिसळतात व पचण्यास थोडा वेळ लागतो व कालांतराने रक्तात मिसळतात व त्याचे हाड, स्नायू यांचा बारीक थर तयार होतो.

. फॅट: याला मराठीमध्ये गळीताची धान्ये असेही म्हणतात. त्यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या चीज, लोणी, बटर वगैरेंचा समावेश होतो. फॅट हे एक जड अन्न असतात.

त्यामुळे ते पचनास थोडा वेळ लागतो. अशा प्रकारे काही द्रव्ये आपल्यात येणारे काही स्निग्ध पदार्थ असतात व ही द्रव्ये आपल्याला पचनाचे कार्यात मदत करतात. या कारणास्तव स्निग्ध पदार्थ लवकर तयार होते व हे रक्तातही मिसळतात. यालाच आपण एनझाईम असे म्हणतो.

प्रथिनेः सर्व प्रथिने आपल्याला भाजीपाला तसेच जनावरे यांच्याकडूनच प्रथिने मिळतात.ही प्रथिने आपल्याला स्नायू बळकट होण्याकरीता असतात. अशा प्रथिनांला अमायनो ॲसिड असे म्हणतात. या २२ अमायनो ॲसिडंना नॉन इसेंशियल अमायनो ॲसिड म्हणतात. कारण ते फक्त आपल्या शरीरातूनच तयार होते व फ्रेडीक यांनी एकंदर १० अमायनो ॲसिड कारण हे १० अमायनो ॲसिड पोटात न घेता बाहेरून घ्यावे लागत आहेत. म्हणून याला अत्यावश्यक अमायनो ॲसिड असे म्हणतात. विसाव्या शतकात आपल्या जीवनसत्त्वावर खूपच संशोधन झाले होते. व या जीवनसत्त्वावर मल्टीव्हिटॅमिन असे म्हणत असे. आपल्याला तान्ह्या बाळाला प्रत्येक बाळंतीणीस स्त्रीला प्रसूती देतानाच मिलव्हाईट ड्रॉप्स लिहीत असत. पुढे याला थेंबाचे औषध असेही म्हणत असत. थेंबाचे औषध घेतले की, पेशंटना काहीच फरक पडत नसे. तेव्हा काही प्रत्येक डॉक्टरने बाबतीत तक्रार केली. शेवटी जागतिक आरोग्य केंद्र आपली नाराजी वरच्या डॉक्टरांना कळविले.

या विषयात काही लोक शाकाहारी अथवा काही बिनशाकाहारी यांचा प्रकार निराळा ठेवला आहे. मटण, मांस, मासे वगैरे खावू की, नये या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. कोणास मांस अजिबात आवडत नाही. थोडक्यात ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. जनावरांचे मांस खाल्याने यावर चरबीचे प्रमाण जास्त असते. यामुळे प्रथिनेही भरपूर असतात. चरबी जास्त प्रमाणात असल्याने थोडा स्थूलपणाही येतो. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढ होण्याने ते हितकारक नाहीत. यात जनावरातील लहान जनावरे घेतली. त्यात कोलेस्टेरॉल कमी होते. उदाहरणार्थ कोंबडी अथवा बदके यांचे मांस नेहमी पांढरे असते. उलट इतर जनावरांचे मांस लाल असते. थोडक्यात बारीक मांस अगदी अल्प प्रमाणात खावे. समुद्रातील, गोड्या पाण्यातील मासे हे देखील तोच प्रकार असतो. कोणत्याही मांस यामध्ये हा प्रथिने विपूल सापडतात. मात्र या माशांमुळे तेल जास्त असते ते जरा कमी प्रमाणात खावे, असे डॉक्टरांचे म्हणणे पडते.

आता प्रश्न येतो एनर्जीचा. पोषण चालू करीताना एक अत्यंत पोषक अन्न असते.

ज्या पोषणात कार्बोहायड्रेट तसेच खनिज द्रव्यात फॉस्फरस अथवा मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम याचे प्रमाण वाढते यालाच संतुलित पोषण आहार असे म्हणता येईल. मात्र उर्जेमध्ये खूप फरक असतो. आपले खेळाडू खेळतात त्यांना अनेक विशिष्ट प्रकार अन्न देणे भाग पडते. एकदा टेनिसपटू पाच पाच, सहा सहा तास सतत खेळत असतो. खेळाडूंना आहार शास्त्र कमी पडते. क्रिकेट खेळताना शतकवीर आपल्या मैदानावर तीनतीन अथवा चार-चार दिवस धावत असतो. अथवा बॉलरला चेंडू फेकतो. अशा खेळाडूंना नवीन प्रकारचे खाद्य तयार देतात. अशा खेळांचे अनेक प्रकार असतात व ते अनेक प्रकारचे अन्न खात असतात. म्हणूनच हे शास्त्र अगदी निरनिराळे असते.

व्हिटॅमिन के जीवनसत्त्वाचा हा शोध १८९९ सालामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये लागला.

जीवनसत्त्व क याचे दोन प्रकार असतात. के-१ फोलेकीन आणि के-२ मेगॅक्विनॉन.

साधारण जीवनसत्त्व केचा उपयोग दक्षिण आफ्रिकेतच जास्त प्रमाणात वापरतात.

याला आरोग्यवर्धिनी असेही म्हणतात. परंतु हे कितपत खरे आहे, हे बघावयास पाहिजे तसेच डॉक्टर लोकांनी विचारल्याशिवाय घेऊ नये. हे मात्र निश्चित.

-श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..