नवीन लेखन...

फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…

 
Baaji Poster

दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे तर कथेत अनोखेपणा नाही; पण फॅण्टासी क्रियेट करुन जुना व सध्याच्या काळाला सांगड घालण्यात काही फरकाने यशस्वी ठरलाय. संवादशैलीलात्या भागातला बाज आहे व मनाला भिडतील असे नाही! रोमॅन्टीक सेन्स बरा असला तरी प्रेमाचा फण्डा अचुकपणे हाताळण्यात आलेला आहे.

बाजीची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूरच्या छोट्याशा गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बारा-चौदा वर्षा नंतरच्या काळातील ही कथा! चिविलदास (श्रेयस तळपदे), हा सामान्य घरातील मुलगा स्वाभावाने बर्‍यापैकी बालीश जो आपल्या आईसोबत (इला भाटे) रहातोय, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. त्याच गावात गौरी (अमृता खानविलकर) नावाची मुलगी आहे जी चिदुची बालमैत्रीणं पण आहे; तिच्या स्वपनातला राजकुमार आहे “बाजी”! बाजी हे पात्र म्हणजे श्रीरंगपूरच्या गावकर्‍यांचा रक्षणकर्ता. कोणत्याही आपत्कालिन स्थितीत बाजी हा गावकर्‍यांच्या मदतीला धावून यायचा. हे सर्व चित्रपटाच्या सुरुवातीला कॉमिकच्या चित्रातून निवेदनात्मक पध्दतीने कथन करुन उत्तमरित्या सादरीकरण तर कुठे कलाकारांच्या अभिनयातून आल्यामुळे सुरुवातीचे प्रसंग खिळवून ठेवणारे आहेत. गौरीच्या स्वप्नातला राजकुमार सुध्दा बाजीच आहे कारण लहान असताना आपल्या गावातल्या जत्रेतील “जाइंट व्हील” वरचा तोल सुटल्यावर अडकल्यामुळे ती पडणार तितक्यात बाजी घोड्यावर येऊन तिला वाचवतो आणि म्हणूनच तिचं इतिहासातल्या बाजी वर प्रेम जडलयं. पण सध्याच्या स्थितीत तिचा मित्र चिदु तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. चिदूचं व्यक्तीमत्त्वा आणि त्याचं स्थान हे आपल्यासाठी केवळ एका उत्तम मित्राप्रमाणे
आहे. कारण त्याच्या गुणांचा दुरपर्यंतही बाजीशी संबंध नाही. त्यामुळे कथेला “रोमॅण्टीक टच” देखील मिळतो. चिदुच्या भोळेपणाचा गैरफायदा अनेकांनी आत्तापर्यंत घेतला असला तरी तो एक थट्टेचा भाग असतो. याच सुमारास मार्तंड (जितेंद्र जोशी)ची एंट्री होते. सुरुवातीला साधा, सरळ असलेल्या मार्तंडची खलकीवृत्ती कशी जागृत होते आणि चित्रपटाच्या अखेरपर्यंत त्याचा खलनायकी चेहर्‍याची खुनशी रुपं कशी उळघडत जातात हे सुरेखरित्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. खलनायक बनलेला मार्तंड पुढे चिदुची हत्या करुन समुद्रात ढकलून देतो. पण ज्यासाठी चिदुची हत्या होते आणि जे बाबी मार्तंडच्या विक्षिप्त पणाला ठरतात ती म्हणजे पुरातन खजिना. आणि या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी बाजी त्या गावात वावरत होता. चिदुच्या हत्ये आधी ज्यावेळी त्याला कळते की आपण बाजीचे वंशज आहोत त्या वेळी गौरी ही गोष्ट तो अनेक मार्गाने पटवून देतो.

shreyas actionपण गौरी चिदुवर प्रेम करत नसल्यामुळे, पुढे ट्विस्ट म्हणून वेगळा प्रसंग साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शका कडून केला गेलाय ज्यामुळे चित्रपट शैलिदार बनतो. कारण चिदु नंतर नव्याने नायकाची एंट्री होणार हे कोणत्याही चित्रपटाचा ठरलेला पॅटर्न असतोच. पुढे नायकाची अर्थात श्रेयस तळपदेची नव्याने एंट्री होते आकाश या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून. आकाश हा हिरे चोर आहे. मुंबईहून हिरे चोरल्यावर थेट समुद्राच्या मार्गाने पोलिसांच्या तावडीतनं निसटत असतानाच त्याची नवका वादळाच्या तडाख्यात उलटते आणि आकाश थेट श्रीरंगपूरच्या समुद्र किनार्‍यावर येऊन आढळतो. चिदुच्या साथीदाराला जेव्हा आकाश बेशुध्द अवस्थेत सापडत़ो त्यावेळी आकाशला चिदुच्या घरी दाखल करण्यात येते. पण आकाश हा खरा चिदु नसून आकाश आहे, हे ज्यावेळी त्याच्या आईलला कळते तेव्हा तिची आई म्हणून झालेली व्याकुळ अवस्था पण त्याचवेळी आकाश श्रीरंगपूर मध्ये असणं ही किती महत्त्वाचं आहे हे ज्यावेळी आकाशला समजतं तेव्हा त्याच्या रुपाने झालेला बाजीचा प्रवेश गावकर्‍यांच्या दृष्टीनेही एकार्थी सुखद अनुभव असतो. इथे मार्तंड व त्याच्या माणसाने अख्खा गाव वेठीस धरलेला असतानाच त्याचा साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झालेली असते तर दुसरी गौरीच्या स्वप्नातला सुपरहिरो परतल्यामुळे “रोमॅन्स फ्लेव्हर” अनुभवायला मिळतो. पण गुन्हेगार असलेला आकाश ज्यावेळी हे सत्य गौरीला सांगणार तितक्यात मार्तंडच्या गुंडांकडून त्याचावर हल्ला होतो पण या प्रसंगाला ही आकाशने केलेली फाईट यामध्ये नाविन्य नसलं तरी त्यापुढे येणारे ट्विस्ट आणि पोलिस इन्सपेक्टर आकाशचा करत असलेला पाठलाग यातून “बाजी स्टाईल”ने सरकलेला चित्रपटाचा शेवट नक्कीच आपल्याला खिळवून ठेवेल.

बाजी चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय, सुयोग्य दिग्दर्शन आणि प्रसंग व काळानुसार केलेला वस्तुंचा वापर, वेशभुषा, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू आणि बाजीची कथा सांगण्यासाठी आकर्षकरित्या केलेलं अॅनिमेशन त्याला जोड म्हणजे सचिन खेडेकरांच कथामय निवेदन. महत्त्वाचं म्हणजे मार्तंडच्या व्यक्तीरेखेला जितेंद्र जोशीचे न्याय दिलायं असंच म्हटलं पाहिजे. पुरस्कारांच्या वेळीही मार्तंडची दखल घ्यावी लागेल. सिनेमाची गाणी सुध्दा कथेच्या प्रसंगाला शोभणारी आहेत.

या चित्रपटाची खटकणारी बाजू म्हणजे लांबलेलं कथानक; सुरुवातीला खुप इंटरेस्टीग वाटणारी कथा नंतर रटाळवाणे वाटत रहातं. “साऊथ टच” असलेल्या फाईट सीन्स याआधी ही अनेक मराठी सिनेमांमधून पहायला मिळाल्या आहेत. त्याच धाटणीवर आधारीत इथेही काही प्रमाणात बघायला मिळतात. दुसरं म्हणजे शेवटच्या ‘सीन’ ला आकाश हा मार्तंड पळवून नेत असलेला खजिना सोडवण्यासाठी घोड्यावरुन येताना दाखवण्यात आलाय; पण मुळात प्रश्न असा मनात येतो की घोडा आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजी चा पोषाख इतक्या वर्षानंतर ही सहीसलामत कसा? न त्याला वाळवी न कुठे छेद? कारण बाजीचा पोषाख हा ज्य ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो त्यावरुन असा शंका येणं सहाजिक आहे!

फॅण्टासी, रोमान्स आणि मसालेदार कथा व अभिनयात वरचढ आणि या सर्वांचं कॉम्बीनेशन म्हणजे बाजी हा सिनेमा. जर अश्या चित्रपटांना आपण पसंत करत असाल तसंच श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला पहाण्यासाठी तरी बाजी एकदा पहायला काहीच हरकत नाही.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..