नवीन लेखन...

पवित्र कुराण आणि आजच्या विज्ञानाचे शोध

आज गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. रात्र चढत होती. अमर , अकबर आणि अन्थोनी एकमेकांना खूप दिवसांनंतर भेटले होते. बालपणीच्या एक एक आठवणी एकमेकांना सांगता सांगता विषय विज्ञानाकडे केंव्हा झुकला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मग विज्ञान आणि कुराण असा विषय निघाला. आजचे जग… विज्ञानाने केलेली प्रगती…, संगणक युग……इथून सुरू झालेला विषय…… गप्पात चांगलाच रंग भरत होता…….

त्यात अमरने भर घातली… अलीकडील काळात तो पवित्र कुराणाच्या अभ्यासात जरा जास्तच रस घेऊ लागला होता… त्याने सांगितले, “ अल कुरआन : सूर : 21 ; आयत 30 आणि अल कुरआन : सूर : 41 ; आयत 11 मध्ये आकाशगंगेच्या उत्पत्ती पूर्वी या आकाशात सुरूवातीला वायुगत रसायन होते असा उल्लेख सापडतो.त्यासाठी तेथे “धूंआ” हा शब्द वापरला आहे…” म्हणजे… आकाश गंगेबाबत जी वैज्ञानिक मते संपूर्ण संशोधांनांती आज सांगितली जात आहेत… त्याच्या कितीतरी काळ अगोदर हे उल्लेख या पवित्र ग्रंथात आलेले आहेत.

यावर अन्थोनीने भर घालतांना सांगितले ,” अल कुरआन : सूर : 31 ; आयत २९ आणि अल कुरआन : सूर : 39 ; आयत 5 मध्ये दिवस व रात्र होण्याची भौगोलिक आणि वैज्ञानिक घटना याबाबत चर्चा आहे. सोबतच त्यात पृथ्वी गोलाकार आहे , ती चपटी असती तर दिवस व रात्र या घटना आज जशा घडतात तशा मुळीच घडल्या नसत्या असा आशय असणार्‍या आयत आहेत. यासाठी अल कुरआन : सूर : 39 ; आयत 5 मध्ये “कव्वर” हा शब्द वापरला आहे ज्याचा अर्थ overlap असा आहे.”

त्यानंतर अकबरने याला जोडून आणि विषयाशी सुसंगत माहिती सांगण्यास सुरुवात केली , “अल कुरआन : सूर : 79 ; आयत 30 मध्ये पृथ्वी दोन धृवांवर चपटी असून तिचा इतर भूभाग नारंगीप्रमाणे अर्थात geo -spherical आहे असे स्पष्ट लिहिले आहे. यासाठी अरबी शब्द वापरला आहे ,’दहाहा” ज्याचा अर्थ आहे शहामृगाच्या अंड्याचा आकार .

आता आकाशात चंद्र चांगलाच डोक्यावर आला होता……. हवेत हवाहवासा गारवा जानवात होता…… दिवसभर सूर्याच्या उष्णतेने तापलेले वातावरण थंड होण्यास सुरुवात झाली होती…… कुणीतरी चहाची आठवण काढली….. मग काय तिघाही मित्रांच्या अंगात तरतरी भरली….. सगळ्यांचे चहाच्या टपरीवर जाण्यासाठी गाडीने जाण्याऐवजी चौकापर्यन्त पायी फेरफटका मारण्यावर एकमत झाले….. छान चहा घेऊन झाला….

अमरने सहज आकाशाकडे नजर टाकली आणि तो सहज बोलला , …”आज चंद्राचा प्रकाश किती आल्हाददायक आहे रे !” ….. त्याचे शब्द पूर्ण होण्यापूर्वीच अन्थोनी बोलला , “ महाशय हा त्या चंद्राचा स्वत:चा प्रकाश थोडाच आहे….. !!! चंद्र तर परप्रकाशित आहे. ….!!! मी तर असे ऐकले आहे की, अल कुरआन : सूर : 25 ; आयत 61 आणि अल कुरआन : सूर : 10 ; आयत 5 तसेच अल कुरआन : सूर : 71 ; आयत 15 व 16 मध्ये उल्लेख आला आहे की, “चंद्र परप्रकाशित असून प्रतिबिंबीत प्रकाश धारक आहे. ” एव्हाना ही भौगोलिक म्हणा वैज्ञानिक म्हणा घटना आपण सर्वांनी शालेय अभ्यासक्रमात अभ्यासलेली आहे यावर सगल्यांचे एकमत झाले. पण हे सगळे संशोधन अगदी अलीकडील काळातील आहे यावर सुधा सगळ्यांनी माना डोलावल्या. यावरून पवित्र कुराणात हे उल्लेख यासर्व मान्य संशोधांनापूर्वीच सांगून ठेवले आहेत. हे ऐकून अमरने आपल्या ज्ञानात भर पडल्याचे मान्य केले.

यावर अकबरने काही विषयांची यादी आणि अल कुरआन मधील आयतींची जंत्री समोर ठेवण्यास सुरुवात केली . तो म्हणाला, “पवित्र कुरआन मध्ये सामान्य विज्ञान, भ्रूण विज्ञान, शरीर रचना विज्ञान, चिकित्सा विज्ञान ( Medical Science), जीव विज्ञान, वनस्पती विज्ञान, समुद्र विज्ञान , भूविज्ञान , जलविज्ञान ची चर्चा आहे” .

जल चक्राचे वर्णन अल कुरआन : सूर : 7 ; आयत 57 , अल कुरआन : सूर : 13 ; आयत 17 , अल कुरआन : सूर : 25 ; आयत 48 व 49 , अल कुरआन : सूर : 35 ; आयत 9 , अल कुरआन : सूर : 3 ; आयत 34 , अल कुरआन : सूर : 45 ; आयत 5 , अल कुरआन : सूर : 50 ; आयत 9, अल कुरआन : सूर : 56 ; आयत 68,69,70 आणि अल कुरआन : सूर : 67 ; आयत 30 . मध्ये आलेले आहे.

…जल विज्ञानानाचे वर्णन अल कुरआन : सूर : 39 ; आयत 21 , अल कुरआन : सूर :30 ; आयत 24 , अल कुरआन : सूर : 23 ; आयत 18 , अल कुरआन : सूर : 86 ;आयत 11 , अल कुरआन : सूर : 24 ; आयत 43 , आणि अल कुरआन : सूर : 30 ; आयत 48 मध्ये आलेले आहे.

तर भूविज्ञानाबाबत अल कुरआन : सूर : 78 ; आयत 6 व 7 , अल कुरआन : सूर : 21 ; आयत 31 , अल कुरआन : सूर : 31 ; आयत 10 , अल कुरआन : सूर : 16 ; आयत 15 , अल कुरआन : सूर : 79 ; आयत 32 इत्यादी मध्ये उल्लेख आहे.

समुद्र विज्ञानाबाबतचे वर्णन अल कुरआन : सूर : 55 ;आयत19 व 20 , अल कुरआन : सूर : 27 ; आयत 61 , अल कुरआन : सूर : 25 ;आयत 53 व 54 , आणि अल कुरआन : सूर : 24 ;आयत 40 मध्ये आले आहे.

चिकित्सा विज्ञान [Medical Science] बाबत अल कुरआन : सूर : 16 ; आयत 69 मध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तर शरीर रचना शास्त्रबाबत अल कुरआन : सूर : 16 ; आयत 66 आणि अल कुरआन : सूर : 23 ; आयत 21 मध्ये रसाळ पद्धतीने माहिती सांगितली आहे.

भ्रूण विज्ञानाबाबत अल कुरआन : सूर : 16 ; आयत 43 , अल कुरआन : सूर : 96 ; आयत 1 व 2 , अल कुरआन : सूर : 86 ; आयत 5 ते 7 , अल कुरआन : सूर : 22 ; आयत 15 ‘अल कुरआन : सूर : 23 ; आयत 13 , अल कुरआन : सूर : 16 ; आयत 14 , अल कुरआन : सूर : 18 ; आयत 37 , अल कुरआन : सूर : 35 ; आयत 11 , अल कुरआन : सूर : 36 ; आयत 77 , अल कुरआन : सूर : 40 ; आयत 67 , अल कुरआन : सूर : 53 ;आयत 46 , अल कुरआन : सूर : 76 ;आयत 2 आणि अल कुरआन : सूर : 80 ; आयत 19 चर्चा केली आहे.

— श्रीपाद यशवंतराव देशपांडे
जिल्हा परिषद कन्या शाळा परभणी
9421083255

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..